पॉर्नोग्राफी अंगलट आली… प्रसिद्ध अभिनेत्रीची ईडीकडून 7 तास कसून चौकशी; काय आहे प्रकरण?

| Updated on: Dec 09, 2024 | 9:35 PM

गेल्या आठवड्यात ईडीने ( सक्तवसुली संचालनालय ) निर्माता राज कुंद्रा आणि अभिनेत्री गेहाना वशिष्ठ यांच्या घरावर धाड टाकली होती. आता अभिनेत्री गहना वशिष्ठ हीची चौकशी करण्यात आली आहे. सोमवारी गहना ईडी कार्यालयात आली होती. तिथे तिची सुमारे सात तास चौकशी करण्यात आली. त्याला पुन्हा मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

पॉर्नोग्राफी अंगलट आली... प्रसिद्ध अभिनेत्रीची ईडीकडून 7 तास कसून चौकशी; काय आहे प्रकरण?
Follow us on

पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ चांगलीच वादात सापडली आहे. पॉर्नोग्राफी नेटवर्कशी जोडलेल्या मनी लॉड्रींग प्रकरणात गेल्या आठवड्यात गहना वशिष्ठ हिच्या घरी ईडीची धाड पडली होती. सोमवारी ही अभिनेत्री ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली. तेथे तिची ईडीकडून सात तास चौकशी झाली.

गहना हीचे नाव बऱ्याच काळापासून पॉर्नोग्राफी प्रकरणाशी जोडलेले गेले आहे. साल २०२१ साली पहिल्यांदा तिचे नाव या प्रकरणात समोर आले होते. गेल्या आठवड्यात तिच्या घरी छापे पडले होते. त्यात अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. आता या प्रकरणात तिची चौकीशी झाली आहे. तिला मंगळवार १० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठ हीची चौकशी –

हे सुद्धा वाचा

गहनाची बॅंक खाती सिल

गेल्या आठवड्यात गहना हीचे सात बॅंक खाती फ्रीज करण्यात आली होती. तसेच त्यांचे दोन मोबाईल फोन आणि अनेक डॉक्युमेंट्स जप्त करण्यात आले होते. गहना हीच्या आधी राज कुंद्रा यांना देखील समन्स जारी करण्यात आले होते आणि त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात देखील आले होते. परंतू त्यांनी थोडा वेळ मागितला होता.जेव्हा पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांना अटक झाली होती. त्याच वेळी गहना या प्रकरणी वादात सापडली. त्याच वेळी तिच्या अडचणी वाढल्या होत्या.

राज कुंद्रा यांच्या घरावरही ईडीची धाड

२९ नोव्हेंबर रोजी राज कुंद्रा यांच्या घरी देखील ईडीची धाड पडली होती. ज्यानंतर या प्रकरणात प्रतिक्रीया देताना त्यांनी या प्रकरणात आपण गेली चार वर्षे तपासाला सहकार्य करीत आहोत. पॉर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात देखील त्यांनी या प्रकरणात अखेर सत्याचा विजय होईल असे त्यांनी म्हटले होते. गेल्या आठवड्यात राज कुंद्रा, गहना वशिष्ठ आणि अन्य लोकांच्या घरी छापेमारी झाल्यानंतर ईडीच्या हाती जे पुरावे मिळाले. त्याच आधारे ईडी पॉर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणाशी जुळलेल्या मनी लॉण्ड्रींग कायद्याचा तपास पुढे नेत आहे.