नवी दिल्ली : दिल्ली राज्य सरकारच्या दारू अमलबजावणी घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणात सुकेश चंद्रशेखर यालाही अटक करण्यात आली आहे. सुकेश 200 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली मंडोली कारागृहात बंद आहे. कॉनमन सुकेश चंद्रशेखर याने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर टोमणे मारणारे एक पत्र लिहिले आहे. तर दुसरे पत्र अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिलाही एक पत्र पाठवले आहे. या दोन्ही गोष्टी वाढदिवसाच्या गिफ्ट आहेत असे त्याने म्हटले आहे. कॉनमन याने केजरीवाल यांचे तिहार क्लबमध्ये स्वागत केले आहे. वाढदिवसाची एवढी चांगली भेट मिळाल्याने खूप आनंद होत असल्याचे तो म्हणाला.
तिहार तुरुंगात कैदी असलेला सुकेश चंद्रशेखर हा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला अनेकदा पत्र लिहितो, निवेदने देतो. आता पुन्हा सुकेश याने जॅकलिनला वाढदिवसाआधी तुरुंगातून प्रेमपत्र लिहिलं आहे. जॅकलिन हिचे नवीन गाणे Yimmy Yimmy हे त्याच्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट आहे असे त्याने म्हटले आहे.
सुकेश याने जॅकलिन फर्नांडिस हिलंय पाठवलेल्या प्रेमपत्रामध्ये लिहिले आहे की, 25 मार्चला माझ्या वाढदिवसाच्या भेटवस्तूसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यात मला मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे. मी ज्या भेटवस्तूबद्दल बोलत आहे ते तुमचे नुकतेच रिलीज झालेले यम्मी यम्मी गाणे आहे.’ सुकेशने या गाण्याचे वर्णन त्याची आणि जॅकलिनची प्रेमकहाणी असे केले आहे.
सुकेश याने आपल्या पत्रात पुढे लिहिले की, “बेबी, गाणे ऐकून मी थक्क झालो. गाण्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ माझ्याबद्दल आहे. हे गाणं एकूणच आमची कथा आहे. मला खात्री आहे की ते ऐकणारे प्रत्येकजण सहमत असेल. आपल्या नात्याबद्दल लोकांना अनेक प्रश्न होते. अनेकांनी वाईट कमेंट्स केल्या होत्या. तुम्ही हे गाणे करून सर्वांना शांत केले आहे. मला खात्री आहे की प्रत्येकाला त्यांचे उत्तर मिळाले आहे.”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरही सुकेश याने भाष्य केले आहे. तिहार तुरुंगात त्यांचे स्वागत आहे. आता भाऊ मिळून क्लब चालवतील असा टोला त्याने लगावला आहे. कॉनमनने 22 मार्च रोजी हे पाच पानांचे पत्र लिहिले आहे.
प्रिय बंधू, अरविंद केजरीवाल… नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होतो. ही नव्या भारताची ताकद आहे. कायद्याच्या वर कोणी नाही याचे ज्वलंत उदाहरण. सर्वप्रथम, तिहारचे बॉस, मी तुमचे स्वागत करतो. तुमचं कट्टर प्रामाणिक विधान आणि सगळं नाटक आता संपुष्टात आलंय. 25 मार्चला माझा वाढदिवस आहे. या दिवशी दुहेरी आनंद साजरा केला जाईल. तुझ्या अटकेला मी माझ्या वाढदिवसाची सर्वोत्तम भेट मानतो. केजरीवाल जी, भाऊ, सत्य जास्त काळ लपवता येत नाही, हे तुमच्या लक्षात आले नाही, असेही सुकेश म्हणाला आहे.