मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील (Adv Jayashree Patil) यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट (Caveat) दाखल केली आहे. अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता असल्याने जयश्री पाटलांनी कॅव्हेट दाखल केली. आरोपांबाबत 15 दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी सुरु करण्यास हायकोर्टाने सीबीआयला सांगितले आहे. (Adv Jayashree Patil files caveat before Supreme Court in Anil Deshmukh Case)
कॅव्हेट म्हणजे नक्की काय ?
एखादे प्रकरण न्यायालयात येण्याची शक्यता असल्यास पक्षकार आपले म्हणणे मांडण्याची संधी आपल्याला द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करतो. कॅव्हेट दाखल झाल्यावर या कोणत्याही न्यायालयाकडून संबंधित प्रकरणावर कसल्याही प्रकारची थेट सुनावणी टाळली जाते. याबरोबरच याच्याशी संबंधित असणाऱ्या पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालय त्याबाबतच्या घेण्यात आलेल्या कोणत्याही निर्णयावर थेट स्थगिती देत नाही. यालाच कॅव्हेट असे म्हटले जाते.
पक्षकाराला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी
अशा प्रकारे कॅव्हेट दाखल केल्यास भविष्यात येणाऱ्या प्रकरणात पक्षकाराला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. ज्यामुळे दोन्हींकडील बाजू ऐकूनच निकाल दिला जातो. सिव्हिल प्रोसिजर कोड 148 अ च्या अंतर्गत कॅव्हेट फाईल केलं जातं.
Param Bir Singh’s corruption allegations against Anil Deshmukh: Petitioner Dr Jaishri Patil(file pic)files caveat before SC as Deshmukh & Maharashtra govt is expected to approach SC against Bombay HC order
HC asked CBI to start preliminary inquiry within 15 days into allegations pic.twitter.com/Ka0bHJE27L
— ANI (@ANI) April 6, 2021
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं.
इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. (Adv Jayashree Patil files caveat before Supreme Court in Anil Deshmukh Case)
अॅड. जयश्री पाटील नेमकं काय म्हणाल्या?
अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय. अनिल देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, असं जयश्री पाटील निकालानंतर म्हणाल्या होत्या.
कोण आहेत जयश्री पाटील? (Who is Adv Jayashree Patil)
संबंधित बातम्या :
अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक
अॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा समाजाची बदनामी, बोलवता धनी सांगणार, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
(Adv Jayashree Patil files caveat before Supreme Court in Anil Deshmukh Case)