अरे बाप आहे की कोण ? वडिलांनीच 2 वर्षांच्या मुलाला विकलं,पत्नीच्या मृत्यूनंतर उचललं धक्कादायक पाऊल

| Updated on: Aug 23, 2024 | 1:09 PM

मुंबईतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्याने त्याच्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला विकून टाकलं. दीड लाख रुपयांसाठी त्याने त्याच्या पोटच्या गोळ्याचीच विक्री केल्याचं समोर आलं आहे.

अरे बाप आहे की कोण ? वडिलांनीच 2 वर्षांच्या मुलाला विकलं,पत्नीच्या मृत्यूनंतर उचललं धक्कादायक पाऊल
Follow us on

विकृत मानसिकतेचे नराधम लहान मुलांवर अत्याचार करत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहेत. त्या सर्व गोष्टी ऐकून कानावर हात ठेवले जातात, ऐकवल्या जात नाहीत. मात्र हे कमी की काय म्हणून मुंबईतून एक अतिशय धक्कादायक, हद्य पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अँटॉप हिलमध्ये एक इसमाने त्याच्या पोटच्या गोळ्याची विक्री केली आहे. त्याने त्याच्या अवघ्या 2 वर्षांच्या मुलाला अवघ्या 1.6 लाख रुपयांसाठी विकून टाकल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पित्यासह चौघांविरूद्ध मानवी तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वडाळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आजोबांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड

मिळालेल्या माहितीनुसार, अँटॉप हिलच्या विजयनगर येथील हा धक्कादायक प्रकार आहे. अमर धीरेन सरदार यांची मुलगी काजल ही विजयनगर येथे रहात होती. तिने आरोपी अनिल पूर्वया याच्याशी दुसरं लग्न केलं होतं. यांना एक दोन वर्षांचा मुलगाही होता. मात्र दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी जल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अनिल व त्याचा मुलगा हे दोेच घरी रहायचे. काजल वडील अमन हे यांना त्यांच्या नातवाची भेट घ्यायची होती, पण गेल्या काही दिवसांपासून ते शक्य होत नव्हतं. त्यामुळे आजोबा अमन यांना संशय आला.

जून महिन्यापासून ते नातवाला भेटण्याची मागणी करत होते, पण आरोपी अनिल दरवेळी काही ना काही कारण देऊन भेट टाळायचा. त्यामुळे अमन यांना संशय आला तेव्हा त्यांनी चौकशी केली असता, जी माहिती समोर आली ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.अनिल यांनी जवळच राहणाऱ्या आस्मा शेख यांच्यामार्फत मुलाला विकल्याचं समजलं. उत्तर प्रदेशातील एक दांपत्याला त्यांनी आपला दोन वर्षांचा मुलगा विकला. अवघ्या 1.6 लाखांसाठी त्यांनी हा सौदा केला. मुलाचे आजोबा अमर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी) पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पित्यासह चौघांवर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वडाळा टीटी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे.

तू मला आवडतेस… मेसज करत व्हॅन चालकानेच शाळकरी मुलीला छेडलं

दरम्यान राज्यात मुलींवरील अत्याचारीच नवनवी प्रकरणं समोर येत आहेत. शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना घडल्याचे उघड जाले आहे. पुण्यात शाळकरी मुलींना छेडण्याचे प्रकार सुरू आहेत. ‘तू मला आवडतेस’ असा मेसेज शाळेच्या व्हॅन चालकानेच एका विद्यार्थिनीला केल्याचे समोर आले. प्रत्यक्ष बोलून आणि इन्स्टाग्रावरही तो सतत मेसेज करून तिला त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहे.

अखेर त्या व्हॅन चालकावर पॉक्से कायद्याअंतर्गत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्या व्हॅन चालकाला चांगला चोप देत समज दिली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. बदलापूरची घटना ताजी असतानाचा पुण्यातील ही घटना समोर आली असून शहरात आणि राज्यात संतापाचे वातावरण आहे.