नवी दिल्ली | 5 ऑगस्ट 2023 : एका 26 वर्षीय तरुणाची मोबाईल डेटींग एपवर एका तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर ते एका कॅफेत ते डेटवर गेले. तेथे त्या तरुणाचे बिलावरुन त्या तरुणीशी वाद होऊन दोघांनी एकमेकांच्या कानाखाली लगावली. त्यानंतर हॉटेलच्या बाऊन्सरनी त्या तरुणावर लैंगिक अत्याचार केला. त्याचे अपहरण करण्यात येऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर एका रुग्णालयात त्या तरुणाला दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
एका डेटींग एपवर त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर पूर्व दिल्लीतील प्रीत विहार येथील कॅफेत त्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला नेले. तेथे त्यांनी वाईन घेतली. त्याचे बिल भरण्यावरुन त्यांचे एकमेकांशी वाद झाले. दोघांनी एकमेकांच्या कानाखाली मारली. त्यानंतर या तरुणाला रेस्टॉरंटच्या बाऊन्सरनी कारमधून मेरटपर्यंत नेऊन मारहाण केली, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पैसे हिसकावून एका कॉलेजजवळ रस्त्यात फेकून दिले. त्यानंतर पिडीताने त्याच्या पालकांना कळविल्यानंतर कॅफेच्या मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
28 जुलै रोजी रात्री 2.13 वाजता पोलिसांना एका जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केल्याची माहीती मिळाली. हा तरुण जबाब देण्याच्या अवस्थेत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या तरुणाने पोलिसांनी आपली व्यथा सांगितली. या तरुणाची डेटींग एपवर एका तरुणीशी ओळख झाली होती. दिल्लीतील विकास मार्ग येथील कॅफेत त्यांनी वाईन पिली. त्यानंतर 2,600 रुपयांचे बिल झाल्याने त्यांचे भांडण झाले. त्यानंतर कॅफेच्या बाऊन्सरनी त्याला मारहाण केली. त्याला गंगनगर येथून कारमध्ये घालून मेरठला नेले. त्याच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार करुन त्याचा व्हिडीओ बनविण्यात आला आणि तो डीलिट करण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपये मागण्यात आले. त्याकडील आठ हजार रुपये, कारच्या चाव्या आणि फोन हिसकावण्यात आल्याची फिर्याद नोंदविण्यात आल्याचे डीसीपी ( पूर्व ) अमृता गुगुलोथ यांनी सांगितले.
या तरुणाला शाहदरा येथील विवेक विहार येथील कॉलेजजवळ रस्त्यात टाकून देण्यात आले. तसेच या प्रकाराविषयी कोणालाही तक्रार करु नकोस अशी धमकी देण्यात आली. हा तरुण कॉर्पोरेट कार्यालयात कामाला असून त्याची डेटींग एपवर या तरुणीशी ओळख झाली. या तरुणीशी बिल भरण्यावरुन तरुणाचा वाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या तरुणाला मारहाण केली. या तरुणीचा या कॅफेच्या कर्मचाऱ्यांशी काही रॅकेट आहे का याचा तपास पोलिस आता करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 308, 365, 394, 377, 506 आणि 34 अन्वये तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे तर दोन महिलांची चौकशी सुरु आहे.