Video : स्कार्फ बांधलेली आई दुसऱ्याच्या बाईकवर आणि बापलेकीकडून सुरू झाला पाठलागचा थरार

| Updated on: Sep 13, 2022 | 1:46 PM

Agra Viral video : पतीने पत्नीला तिच्या मित्रासोबत रंगेहाथ पकडलं होतं. यावेळी एकमेकांना जबर शिविगाळ सुरु झाली. पती पत्नीच्या मित्राला गाडी थांबवण्यास सांगत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. पतीने सगळा राग काढायला सुरुवातही केली. हाणामारीही झाली. त्यानंतर...

Video : स्कार्फ बांधलेली आई दुसऱ्याच्या बाईकवर आणि बापलेकीकडून सुरू झाला पाठलागचा थरार
हायव्होल्टेज ड्रामा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रामध्ये (Agra Viral Video) एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. एक महिला आपल्या पतीपासून लपून छपून परपुरुषासोबत फिरत होती. पण पतीने आपल्या पत्नीला (Husband wife clash) परपुरुषासोबत लपून छपून फिरताना रंगेहाथ पकडलं. त्यामुळे तिचा भांडाफोड झाला. पण भांडाफोड होण्याआधी भररस्त्यामध्ये पती-पत्नीमध्ये पकडा-पकडीचा थरार पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. पतीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. पती मागून येतोय, हे कळल्यानंतर पत्नीची घाबरगुंडी उडाली होती. तिच्यासोबत असलेल्या पुरुषानेही दुचाकी पळवली आणि आणि मग हायव्होल्टेज ड्रामा रंगला.

आजतकने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला सफेद कपड्यांमध्ये तोंड पूर्णपणे झाकून एका स्कूटीवर मागच्या बाजूला बसली आहे. त्यानंतर दुसरी एक व्यक्ती मागून येते आणि स्कूटी थांबवायला सांगू लागते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, दुचाकीवर मागे बसून परपुरुषासोबत फिरणाऱ्या महिलेचा पतीच असल्याचं समोर आलंय.

हे सुद्धा वाचा

भर दुपारी हा सगळा हायव्होल्टेज ड्रामा घडला. पतीला पत्नीवर खूप संशय होता. तिचे दुसऱ्या कुणासोबत तरी अनैतिक संबंध आहेत, अशी त्याला शंका होती. एक दिवस पत्नी अचानक पतीला काहीही न सांगताच गुपचूप घराबाहेर पडली. पतीचा संशय अधिकच बळावला. पतीही आपल्या मुलीला सोबत घेऊन पत्नीचा सुमडीत पाठलाग करु लागला. पाठलाग करताना पतीने जे पाहिलं त्याने तो हादरुनच गेला. कारण पतीचा संशय खरा ठरला होता.

पाहा लाईव्ह घडामोडी : व्हिडीओ

पतीने पत्नीला तिच्या मित्रासोबत रंगेहाथ पकडलं होतं. यावेळी एकमेकांना जबर शिविगाळ सुरु झाली. पती पत्नीच्या मित्राला गाडी थांबवण्यास सांगत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. पतीने सगळा राग काढायला सुरुवातही केली. हाणामारीही झाली. त्यानंतर पोलिसांनाही हे प्रकरण गंभीर असल्याचं लक्षात आलं. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सगळ्यांना घेऊन पोलीस ठाण्यात आणलं आणि सगळ्यांनाच ताकीद देण्यात आली.

पोलिसांनी पती आणि महिला पुरुषाच्या मित्रावर शांतता भंग केल्याप्रकरणी दंड वसूल केला. शिवाय दोघांनाही भविष्यात असं काहीही न करण्याचा दमही दिला. 10 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडणं सुरु झालं होतं. महिला गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद वागत होती. तिचे एका व्यावसायिकाशी संबंध असल्यावरुन पतीला संशय होता. या दाम्पत्याला एक मुलगीही आहे. आपल्या मुलीला घेऊनच पती पत्नीचा पाठलाग करण्यासाठी निघाला होता. त्यादरम्यान, घडलेल्या या संपूर्ण घटनेनं मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी!