निर्घृण ! घराच्या जागेवरून वाद पेटला, त्याने थेट अंगावर कारच चढवली, महिलेसह लहान मुलगा….

| Updated on: Nov 25, 2023 | 9:14 AM

घराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादातून एक क्रूर हत्याकांड घडलं. मात्र त्यामध्ये एक आई आणि निष्पाप, निरागस मुलाला जीव गमवावा लागला. घराच्या जागेबद्दल शेजाऱ्यांशी सुरू असलेल्या वादातून एक इसमाने भरधाव वेगाने कार चालवत ती मायलेकाच्या अंगावर घातली.

निर्घृण ! घराच्या जागेवरून वाद पेटला, त्याने थेट अंगावर कारच चढवली, महिलेसह लहान मुलगा....
Image Credit source: TV9 Network
Follow us on

अहमदनगर | 25 नोव्हेंबर 2023 : आजकाल माणुसकी नावाच प्रकारच उरलेला नाही. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशीच एक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे, जिथे जागेवरून सुरू असलेल्या वादाचा अतिशय हिंसक आणि दुर्दैवी शेवट झाला. घराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादातून एक क्रूर हत्याकांड घडलं. मात्र त्यामध्ये एक आई आणि निष्पाप, निरागस मुलाला जीव गमवावा लागला. घराच्या जागेबद्दल शेजाऱ्यांशी सुरू असलेल्या वादातून एक इसमाने भरधाव वेगाने कार चालवत ती मायलेकाच्या अंगावर घालत त्यांना चिरडलं.

यामध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेनंतर आरोपी किरण अद्याप फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली असून मायलेकाच्या मृत्यमुळे लोकं हळहळ व्यक्त करत आहेत.

घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या पारनेरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. येणारे आणि श्रीमंदिलकर हे कुटुंब तिथे शेजारी शेजारी राहतात.. मात्र गेल्या काही दिवसांपासू त्यांच्यात वाद सुरू होता. त्यांच्या घराशेजारी असलेल्या जागेच्या मोजणीच्या मुद्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झालं आणि वितुष्ट आलं. यात रागातून गुरूवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी किरण श्रीमंदिलकर याने येणारे यांची सून शितल येणारे आणि त्यांचा अवघ्या अडीच वर्षांचा नातू स्वराज यांच्या अंगावर कार घातली. या दुर्दैव घटनेत मायलेकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधार्थ पथके पाठवली आहेत.