मुंबई : दोघा तरुणांना मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Social Media Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये ज्यांना मारहाण केली जातेय, ते दोघे मुस्लिम तरुण (Muslim youth beaten video) असल्याचं बोललं जातंय. सदर घटना अहमदाबादच्या (Ahmedabad) गरबा कार्यक्रमातील असल्याचंही सांगितलं जातंय.विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम तरुणांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय.
वाईट उद्देशाने मुस्लम तरुण गरबा कार्यक्रमात शिरल्याचा दावा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला, आणि त्यांना चोप चोप चोपलं. त्यानंतर या मुस्लिम तरुणांचे कपडेही फाडण्यात आले. त्यांना उघडं करुन काही कार्यकर्ते मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय. अखेर भयभीत झालेल्या तरुणांनी कार्यकर्त्यांच्या तावडीतून कसाबसा पळ काढला.
न्यूज 24 ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम तरुणांबाबत आधी सांगण्यात आलं होतं. दोघे तरुण गरबा कार्यक्रमात आले असल्याची माहिती मिळाल्याने कार्यकर्ते गरबा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मुस्लिम तरुणांना जाब विचारण्यास सुरुवात केली. तरुणांकडे काही ठोस उत्तर नसल्यामुळे अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
Ahmedabad: Two Muslim youths were beaten up in Garba, VHP and Bajrang Dal workers had come to check on getting information
So has it become such a crime to celebrate the festival of Hinduism?https://t.co/WL2pRiKmqD pic.twitter.com/lcFEjNt9vw
— Dr ManMohan Singh ? (@Mr_ManmohanSing) September 28, 2022
मारहाणीत एका तरुणाचं शर्ट फाटलं. त्यानंतरही कार्यकर्ते काही त्याला मारहाण करायचे थांबले नाहीत. व्हिडीओमध्ये दोघेही मार खाणारे तरुण गयावया करताना दिसून आलेत. व्हायरल झालेला व्हिडीओ अहमदाबादच्या एसपी रिंग रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या गरबा उत्सवातील असल्याचं सांगितलं जातंय.
अद्याप या घटनेप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसही आता ऍक्शन मोडमध्ये आलेत. पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केलीय. चौकशीत कुणी दोषी आढळलं, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं जातंय.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये काहींनी या तरुणांवर चोरीचा आरोप केलाय. तसंच गरबा खेळायला आलेल्या तरुणींची छेड काढण्याच्या उद्देशाने हे तरुण आले होते, असाही आरोप करण्यात आलाय. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.