शिर्डी : श्रीरामपूरचे व्यापारी गौतम हिरण (Gautam Hiran Kidnap Murder Case) यांची अपहरण करुन हत्या करणारे आरोपी जेरबंद झाले आहेत. नाशिकमधून चार, तर अहमदनगरच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. एक मार्चला अपहरण झालेले अहमदनगरमधील व्यापारी गौतम हिरण यांचा सात तारखेला मृतदेह सापडला होता. (Ahmednagar Trader Gautam Hiran Kidnap Murder Case five more accuse arrested)
चौघं नाशिकचे, अहमदनगरचा एक अटकेत
गौतम हिरण हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे व्यापारी होते. हिरण यांच्याजवळील 1 लाख 65 हजार रुपये लंपास करण्यात आले होते. एक मार्चला त्यांचं खंडणीसाठी अपहरण झालं होतं, तर 7 मार्च रोजी त्यांचा मृतदेह सापडला होता. संदीप हांडे, जुनेद शेख, अजय चव्हाण, नवनाथ निकम आणि एका 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी चौघं नाशिकचे, तर एक जण अहमदनगरचा रहिवासी आहे.
गौतम हिरण अपहरण आणि हत्या प्रकरणात याआधी दोन आरोपींना अटक झाली आहे. त्यामुळे अटकेतील एकूण आरोपींचा आकडा सातवर पोहोचला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली.
भाजप आक्रमक
अहमदनगरच्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी म्हणून भाजप आक्रमक झाली होती. हिरण यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून राज्यव्यापी आंदोलन केलं होतं. तसा इशारा भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख आणि भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जैन समाज प्रमुख संदीप भंडारी यांनी दिला होता.
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन याविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याप्रश्नी आवाज उठवला होता.
संबंधित बातम्या :
व्यापारी गौतम हिरणच्या मारेकऱ्यांना अटक करा; भाजपचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन
(Ahmednagar Trader Gautam Hiran Kidnap Murder Case five more accuse arrested)