महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार समोर, बंटी-बबलीने एटीएमला लावला ट्रॅप, केलं असं काही सगळेच झाले चकीत

| Updated on: Feb 14, 2024 | 5:39 PM

एटीएममध्ये होणाऱ्या निरनिराळ्या फ्रॉडमुळे सर्वसामान्यांचा बॅंकेतील पैसा आता सुरक्षित राहीलेला नाही. चोरटे नवनवीन एटीएम कार्ड स्नॅनर करण्याच्या कृल्प्त्या शोधून काढत आहेत. आता एक नवीन पद्धती शोधून काढीत एका जोडगोळीने एटीएममधील नागरिकांचा पैसा लुटल्याचे उघडकीस आले आहे.

महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार समोर, बंटी-बबलीने एटीएमला लावला ट्रॅप, केलं असं काही सगळेच झाले चकीत
atm fraud
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर | 14 फेब्रुवारी 2024 : एटीएम कार्ड धारकांनी सावध व्हावे अशी घटना घडली आहे. तुमचा पैसा एटीएम मशिनमधून केव्हाही चुटकीसरशी काढणारी एक टोळी उघडकीस आली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी या अनोख्या घोटाळ्याने हादरली आहे. उत्तर प्रदेशातील एका बंटी आणि बबली जोडगोळीने नवा एटीएम फ्रॉड केला आहे. या टोळीने हा घोटाळा करण्यासाठी खास प्रशिक्षण घेतले होते. ही बंटी-बबली जोडीने एकाच दिवसात नागपुरातील अनेक एटीएम लुटल्याचे  उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलिस सावध झाले. पोलीसांनी सीसीटीव्हीचा तपास करीत या बंटी-बबलीला अखेर कसे जाळ्यात पकडले पाहा…

नागपूरात एटीएममधून नागरिकांचे पैसे लुटल्याचे एकाच दिवसात दोन – तीन घटना घडल्या होत्या. तक्रारदारांनी दिलेल्या माहीतीनूसार नागरीकांचे पैसे एटीएममधून निघायचे नाहीत. मात्र पैसे काढल्याचे मॅसेज यायचे त्यामुळे बॅंक खात्यातून हजारो रुपये गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने अजनी पोलिस सावध झाले. त्यानंतर एका एटीएममधील सीसीटीव्ही यंत्रणेत हे जोडपे दिसल्याने त्यांचा खेळ खल्लास झाला. त्यानंतर पोलिस त्यांच्यापर्यंत पोहचले.

अशी करायचे चोरी

ज्या एटीएममध्ये चोरी करायची आहे. त्या एटीएमला हेरुन ते तेथे एटीएम मशिनला स्कीमर लावायचे. त्यानंतर लपून बसायचे. आधी एटीएममध्ये जाऊन पैसे निघणाऱ्या ठिकाणी ते लोखंडी क्लिप अडकवून ठेवायचे आणि पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे पैसे निघायचे नाहीत. तो व्यक्ती बाहेर निघताच ही जोडी त्या ठिकाणी जाऊन ते पैसे काढून घ्यायचे. एकाच दिवशी नागपुरात दोन ते तीन ठिकाणी यांनी हा प्रकार केला मात्र एका ठिकाणी हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि पोलिसांनी या बंटी-बबलीच्या मुसक्या आवळल्याचे उघडकीस आले.

उत्तर प्रदेशातून यायचे…

आदिल राजू खान ( प्रतापगढ, युपी ) आणि प्रियंका सिंग ( कानपूर, युपी ) असे या बंटी-बबली जोडगळीचं नाव आहे. दोघेही ट्रेनने पहाटे येऊन एटीएमफोडून चोरी करायचे आणि रात्री युपीला जायचे. मात्र यावेळी त्यांचा गेम फसला. कारण सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि बंटी-बबली जोडगोळी पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांच्या तपासात त्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालं असून या कामासाठी त्यांनी विशेष ट्रेनिंग घेतल्याचे सुद्धा पुढे येत आहे. पोलीस आता यांनी कुठे कुठे असे प्रकार केले याचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले.