महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar News) शहरातील चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या राजेंद्र बारबिंडे नावाच्या एका व्यक्तीने जालन्यात गावाकडे जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळा मागील भिंतीलगत लावलेले रामनाथ राठोड यांचे ट्रॅक्टर चक्क ट्रॉलीसह चोरले. ट्रॅक्टर चोरी (tractor robbery) झाल्याची तक्रार मालकांनी तात्काळ पोलिसांच्या कानावर घातली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सगळीकडे चौकशी सुरु केली. पोलिसांनी ट्रॅक्टर कोणत्या दिशेला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला २४ तासात ताब्यात घेतले. त्या चालकाकडे असणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपीला पोलिसांनी (crime news in marathi) ताब्यात घेतले असून त्याचा सध्या चौकशी सुरु आहे.
देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील एका व्यापाऱ्याचे तिसऱ्यांदा दुकान फोडून 1 लाख 42 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करून पंधरा दिवस झाले. तरीही मरखेल पोलिसांना चोरटे सापडले नसल्याने मरखेल पोलिसांच्या कार्यशैली बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अकोला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवाहनगर परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका दुकानाचे शटर वाकवून दुकानात शिरलेल्या तिघांना पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानाने चोरी करतांना तिघांना रंगेहात पकडले आहे.
पुण्याहून भोर वरंधघाटमार्गे महाडकडे जाणाऱ्या मार्गावरील साळेकरवाडी वाठार येथे भरधाव कार शेतात घुसून पलटी झाल्यानं अपघात झाला. या मार्गावरील एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुलटल्यानं, कार थेट रस्त्याशेजारी असणाऱ्या भात खाचरात शिरली आणि पलटी झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, कारचं मात्र नुकसान झालंय. कार महाडकडून पुण्याच्या दिशेने येतं असताना संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला.