चाकू, तलवारी, रायफल, अन् बंदुका, अवैध शस्त्रांचं मोठं घबाड, भुसावळमध्ये पोलिसांची धडक कारवाई

| Updated on: Jul 31, 2021 | 7:54 PM

भुसावळ शहरातील इदगा परिसरात एका घरत तब्बल अकरा शस्त्रं सापडली आहेत. यामध्ये चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदुका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

चाकू, तलवारी, रायफल, अन् बंदुका, अवैध शस्त्रांचं मोठं घबाड, भुसावळमध्ये पोलिसांची धडक कारवाई
BHUSAWAL WEAPONS
Follow us on

जळगाव : भुसावळ शहरातील इदगा परिसरात एका घरात तब्बल अकरा शस्त्रं सापडली आहेत. यामध्ये चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदुका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. हा अवैध शस्त्रसाठा बाळगणारे दोन आरोपी फरार झाले आहेत. आरोपी शेख पप्पू, त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख असे फरार झालेल्या आरोपींची नावे असून भुसावळ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (along with Knife Sword and Rifle total Elven weapons have been seized by Bhusawal Jalgaon police)

शहरातील इदगा भागात पोलिसांनी घराची झडती घेतली 

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख पप्पू व त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख यांच्याजवळ अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. खबऱ्याने ही माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शेख पप्पू व त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख यांच्यावर कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार पोलिसांनी एक गुप्त मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने भुसावळ पोलिसांनी शहरातील इदगा या भागात एका घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांना अवैध शस्त्रे सापडली.

चार चाकू, चार तलवार, एक रायफल, दोन बंदुका जप्त

हे सर्व शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपी शेख पप्पू व त्याचा मुलगा रिजवान पप्पू शेख हे दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी यांच्याच मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला होता. यामध्ये पोलिसांना चार चाकू, चार तलवार, एक रायफल, दोन बंदूक असा शस्त्रसाठा सापडला.

कलम 342 प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

दरम्यान, हा शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर फरार झालेल्या वरील दोन आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कायद्यातील कलम 342 प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

इतर बातम्या :

आधी गळा आवळला नंतर पोत्यात भरलं, प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी तिनं पतीला संपवलं, चंद्रपूर हादरलं

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

पाणी रिसायकलिंग पॉवर स्टेशनमध्ये कुजलेला मृतदेह, परिसरात एकच खळबळ, नागपुरात नेमकं काय घडलं?

(along with Knife Sword and Rifle total Elven weapons have been seized by Bhusawal Jalgaon police)