विधानसभेत आमदार नितेश राणे यांची लक्षवेधी, अंबडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी

| Updated on: Jan 19, 2023 | 7:51 AM

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते, त्यानुसार या चौकशीला सुरुवात होणार असून देशमुख यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

विधानसभेत आमदार नितेश राणे यांची लक्षवेधी, अंबडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक शहर पोलीस दलातील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. नुकतेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी लक्षवेधी मांडून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या संदर्भातील तक्रारीची चौकशी मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यावरून तब्बल 20 दिवसांनी ही चौकशी सुरू होणार असून त्या अगोदर शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी देशमुख यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. अप्पर पोलीस महासंचालकांकडून ही चौकशी केली जाणार आहे. निष्पक्ष चौकशी व्हावी याकरिता ही बदली केल्याचे सांगितले जात आहे. भगीरथ देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याने आणि त्यांची बदली करण्यात आल्याने पोलीस ठाण्यात देखील दबक्या आवाजात उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अंबडचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आमदार नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली होती.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते, त्यानुसार या चौकशीला सुरुवात होणार असून देशमुख यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

वाढती गुन्हेगारी, आर्थिक मुडद्यांच्या बाबतीत होणारी वसूली, याशिवाय तक्रारदाराकडेच लाच मागीतल्याचा मुद्दा राणे यांनी सभागृहात उपस्थित केला होता, त्यावरून देशमुख यांची चौकशी केली जाणार आहे.

भगीरथ देशमुख यांच्याबाबत पोलीस ठाण्यातील कर्मचारीही समाधानी नव्हते, मोजक्याच कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कामे करून घेणे आणि इतरांना उर्मठपणे बोलणे अशा विविध तक्रारी देखील वरिष्ठ पातळीवर पोहचल्या होत्या.

त्यामुळे देशमुख यांची अंबड येथील कारकीर्द अधिकच चर्चेत आली असून होऊ घातलेल्या चौकशीत भगीरथ देशमुख यांच्याबाबत काही तथ्य आढळून येते का ? याशिवाय देशमुख यांच्यावर काय कारवाई होते? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.