अंबरनाथ / निनाद करमरकर : किरकोळ वादातून पालिकेच्या पार्किंगमध्ये फेरीवाले आणि रिक्षाचालकांनी पार्किंग कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या पे अँड पार्कमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पार्किंग कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबरनाथ पालिकेचं पे अँड पार्क आहे. या पार्किंगमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास काही रिक्षाचालक आणि फेरीवाले घुसले. त्यांनी पार्किंग कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण सुरू केली. अक्षरशः मोठ्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या डोक्यात मारण्यात आल्या.
पार्किंगच्या बाहेर झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पार्किंग कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच एका रिक्षा चालकाचा आणि शहर बस चालक यांच्यात मारामारीची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजी नगरमधील ही घटना आहे. अखेर कार पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रिक्षा चालकाला आणि बस चालकाला ताब्यात घेण्यात आले. रस्त्यावर काही काळ ट्रॅफिक जमा झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत वाहतूक सुरळीत केली.