शाळेत रिकाम्या बाटल्यांचा खच पाहून पालक हैराण, पालिका आणि पोलीस प्रशासनाच दुर्लक्ष

| Updated on: Aug 19, 2023 | 7:57 AM

crime news : अंबरनाथ मधील एका शाळेत धक्कदायक प्रकार उजेडात आला आहे. दिवसा विद्यार्थ्यांची शाळा रात्री मद्यपींचा अड्डा असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. कसलीचं कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

शाळेत रिकाम्या बाटल्यांचा खच पाहून पालक हैराण, पालिका आणि पोलीस प्रशासनाच दुर्लक्ष
kalyan crime news in marathi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अंबरनाथ : पालिकेच्या (KDMC) एका शाळेत अनेकदा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे उघडकीस आलं आहे. सध्याचा अंबरनाथ (Ambernath News)मधील जो प्रकार आहे. तो अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. त्यावर पालिका किंवा पोलिस प्रशासन कारवाई करीत नसल्यामुळे ते मद्यपी सुध्दा बिनधास्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. हा प्रकार अंबरनाथ पूर्वेकडील वडवली (wadvali crime news in marathi) येथील आहे. वारंवार तक्रार दाखल करुन काहीचं होत नसल्यामुळे नागरिक आणि पालक चिंतेत आहे. याबाबत अद्याप पोलिस किंवा महापालिकेकडून कसल्याची प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पालिका आणि पोलीस प्रशासनाच दुर्लक्ष

अंबरनाथमधील पालिकेच्या शाळेतील परिसरात सध्या मद्यपींचा अड्डा बनला असून रात्रीच्या वेळेस येथे मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मात्र याकडे पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अंबरनाथ पूर्व भागातील वेल्फेअर सेंटरलगत असलेल्या पालिकेच्या शाळा परिसर सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे. ती बसत असलेले सगळे मद्यपी रात्री तो परिसर गलीच्छ करुन टाकतात.

हे सुद्धा वाचा

मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

शाळेच्या आजूबाजूला मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस मद्यपी बिनधास्तपणे आपली मैफल जमवून बसतात अशी माहिती नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे. मात्र याकडे पालिका आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे वारंवार उजेडात आले आहे. या परिसरात बाजूच्या भागात सोसायटी आणि एक रिक्षा स्टँड आणि पालिका खत प्रकल्प देखील आहे. त्यामुळे आता या मद्यपींवरती त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.