अमरावती: अकोट (Akot) ते दर्यापूरकडे (Daryapur) निघालेला ट्रक रात्री दोनच्या सुमारास पुलावरून खाली कोसळला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रकचं स्पीड इतक होतं की, सुरुवातीला टपरी उडविली. त्यानंतर ट्रक पलटी झाला. जखमी झालेल्या तिघांना अमरावतीच्या (Amravati) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रात्री दोनच्या सुमारात जत्रेची खेळणी असलेला ट्रक सुसाट निघाला होता. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यावर सुरुवातील टपरीचे नुकसान झाले. त्यानंतर ट्रक पूलावरुन पलटी झाला. त्यामध्ये तिघांना जबर मार लागला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातामुळे जोराचा आवाज झाला, त्यावेळी तिथल्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि जखमी झालेल्या लोकांना अमरावतीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
सध्या घटनास्थळी अपघाताची गाडी पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मुख्य रस्त्यावर किरकोळ वाहतूक ठप्प झालेली आहे. भयानक झालेल्या अपघातामध्ये कसल्याही प्रकारची जीवितहाणी झालेली नाही.