Amrutsar Fire : शेतांमध्ये लावलेल्या आगीत 24 मुले घेऊन जाणारी स्कूल बस अडकली, ज्वाळांमध्ये सात मुले होरपळली, काचा फोडून केली मुलांची सुटका

| Updated on: May 04, 2022 | 10:07 PM

पंजाब सरकार आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतरही, शेतकरी गव्हांच्या शेतातील काड जाळायचे थांबलेले नाहीत. बुधवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेत स्कूल बस या आगीच्या ज्वाळांमध्ये सापडली. बाटलापासून जवळ असलेल्या बिजलीगावाजवळ शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी ही बस चालली होती.

Amrutsar Fire : शेतांमध्ये लावलेल्या आगीत 24 मुले घेऊन जाणारी स्कूल बस अडकली, ज्वाळांमध्ये सात मुले होरपळली, काचा फोडून केली मुलांची सुटका
शेतांमध्ये लावलेल्या आगीत 24 मुले घेऊन जाणारी स्कूल बस अडकली
Image Credit source: tv9
Follow us on

अमृतसरगव्हाच्या शेतातलं (Wheat Farm) काड जाळण्यासाठी लावलेल्या आगीत स्कूल बस (School Bus) अडकल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये (Punjab Fire) बटाला येथे घडली. या बसमध्ये असलेले सात विद्यार्थी या आगीत वाईटरित्या अडकले. अखेरीस बसच्या काचा फोडून या मुलांना बाहेर काढावे लागले. आगीत होरपळलेल्या या सातही मुलांची प्रकृती गंभीर असून, त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून त्यांना हायर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. या बसमधून 42 विद्यार्थी प्रवास करत होते. पंजाब सरकार आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतरही, शेतकरी गव्हांच्या शेतातील काड जाळायचे थांबलेले नाहीत. बुधवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेत स्कूल बस या आगीच्या ज्वाळांमध्ये सापडली. बाटलापासून जवळ असलेल्या बिजलीगावाजवळ शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी ही बस चालली होती. या बसमधून 42 विद्यार्थी प्रवास करीत होते.

बस कशी सापडली ज्वाळांमध्ये

बस जेव्हा बिजलीगावात पोहचली तेव्हा शेतातील गव्हाच्या काडाला आग लावण्यात आलेली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतांमध्ये ही आग पसरलेली होती. आगीच्या धुरामुळे बस चालकाला समोरचे काही दिसत नव्हते. त्यामुळे बस एका शेतात जाऊन पलटली. यानंतर काही वेळातच संपूर्म बस आगीच्या ज्वाळांमध्ये सापडली.

मुलांच्या किंकाळ्या ऐकून रस्त्याने जाणारे थांबले

बस आगीच्या ज्वाळांमध्ये सापडल्यानंतर, बसमधील विद्यार्थ्यांनी भीतीने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. या मुलांच्या किंकाळ्या ऐकून रस्त्यानी जाणारे अनेक जण घटनास्थळी पोहचले. त्यांनी बसच्या काचा फोडल्या आणि मुलांना बाहेर काढले. यातही ४२ पैकी ७ मुलं आगीत होरपळली. त्यानंतर स्थानिकांची या मुलांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या लहानग्यांच्या किंकाळ्या ऐकवत नव्हत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग इतकी भयंकर होती की मुलांना बाहेर काढणे अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा