Crime : मुलाच्या युनीफॉर्मचे पैसे मिळाले नाहीत; चिडलेला बाप थेट तलवार घेऊन शाळेत पोहोचला

| Updated on: Jul 09, 2022 | 7:45 PM

बिहारमधील अररिया परिसरात असलेल्या एका शाळेत हा सर्व थरार घडला आहे. येथील एका व्यक्तीने तलवार घेऊन मुलाच्या शाळेत दहशत माजवली आहे. मुलाच्या गणवेशाच्या पैसे मिळाले नाहीत म्हणून आरोपीने हे कृत्य केले. शाळेचे मुख्याध्यापक मो. जहांगीर आलम यांनी जोकीहाट पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Crime : मुलाच्या युनीफॉर्मचे पैसे मिळाले नाहीत; चिडलेला बाप थेट तलवार घेऊन शाळेत पोहोचला
नागपूरमध्ये 250 ग्रॅम ड्रग्ज जप्त
Image Credit source: tv9
Follow us on

पाटणा : सर्वच शाळांमध्ये विविध शुल्कांच्या नावावर पालकांची लुट केली जात आहे. यामुळे पालक संतापले आहेत. संतापाच्या भरात माणूस काही करु बसतो. असाच एक संतापलेला पिता थेट तलवार घेऊन शाळेत पोहोचला आहे. मुलाच्या युनीफॉर्मचे पैसे मिळाल्याने या पित्याने तलवारीचा धाक दाखवण्याता प्रयत्न केला. बिहारमध्ये ही विचित्र घटना घडली आहे.

बिहारमधील अररिया परिसरात असलेल्या एका शाळेत हा सर्व थरार घडला आहे. येथील एका व्यक्तीने तलवार घेऊन मुलाच्या शाळेत दहशत माजवली आहे. मुलाच्या गणवेशाच्या पैसे मिळाले नाहीत म्हणून आरोपीने हे कृत्य केले. शाळेचे मुख्याध्यापक मो. जहांगीर आलम यांनी जोकीहाट पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

आरोपीचे नाव अकबर आहे. त्याचे घर शाळेच्या जवळच आहे. मुलाच्या गणवेशाचे पैसे न मिळाल्याच्या कारणातून तो तलवार घेऊन शाळेत आला होता. त्याने तलवारीचा धाक दाखवत शिक्षकांना धमकी दिल्याचे शाळेचे मुख्याध्यापक जहांगीर आलम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार म्हंटले आहे.

हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आलम यांनी जोकीहाट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. विशेष म्हणजे आरोपी अकबर याने एक वर्षापूर्वी देखील शाळेत येऊन अशाचप्रकारे धिंगाणा घातला होता. त्याने शिक्षकांसोबत असभ्य वर्तन करत शाळेतील मुलांच्या दुपारच्या जेवणाचे सामान आणि पैसे जबरदस्तीने मागितल्याचेही पोलिसांना करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर तो शाळेच्या वस्तू चोरून बाजारात विकतो, असा आरोप देखील मुख्याध्यापकाकडून करण्यात आला आहे.त्याने शाळेकडून 50 हजार रुपयांची खंडणी मागीतल्याचेही शाळेडकून सांगण्यात आले.

मुख्याध्यापक जहांगीर आलम यांनी पुढे सांगितले की, या महिन्यात 5 जुलै रोजी मी जीतू चौकातील शालेय वस्तू विक्रेते याकूब यांच्या किराणा दुकानात अंडी खरेदी करण्यासाठी गेलो होतो. यावेळी आरोपी अकबरही तेथे आला. त्याने याकूबकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच त्याने माझ्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली. यानंतर धमकी देत तो घटनास्थळावरून पळून गेल्याचेही आलम यांनी सांगितले.
गुन्हा दाखल

आरोपी अकबरची मुले त्याच शाळेत शिकतात, मात्र आजतागायत त्याच्या मुलांना वह्या आणि गणवेशाचे पैसे मिळालेले नाहीत. याच कारणावरून रागाच्या भरात तो तलवार घेऊन शाळेत पोहोचला आणि शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी जोकीहाटचे पोलिस अधिकारी म्हणाले की, मुख्याध्यापकाकडून लेखी तक्रार मिळाली आहे. आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.