उल्हासनगरात चाकू दाखवून मोबाईल लुटण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Dec 17, 2022 | 6:56 PM

एका चोरट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि मोबाईल देण्याची मागणी केली. मात्र या व्यक्तीने घाबरून आतमध्ये पळ काढला. यानंतर चोरटा देखील तिथून निघून गेला.

उल्हासनगरात चाकू दाखवून मोबाईल लुटण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित
Image Credit source: Google
Follow us on

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दररोज काही ना काही घटना उघडकीस येत आहेत. गुन्हेगारीमध्ये चोऱ्या, लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. चाकूचा धाक दाखवत मोबाईल लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सेक्शन 17 मधील डर्बी हॉटेलजवळ घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

डर्बी हॉटेलजवळ घडली घटना

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील कल्याण बदलापूर मुख्य रस्त्यावर 17 सेक्शन चौकात डर्बी हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक व्यक्ती मोबाईलवर बोलत उभी होती.

घटना सीसीटीव्हीत कैद

यावेळी तिथे आलेल्या एका चोरट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि मोबाईल देण्याची मागणी केली. मात्र या व्यक्तीने घाबरून आतमध्ये पळ काढला. यानंतर चोरटा देखील तिथून निघून गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हे सुद्धा वाचा

खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने मोबाईल चोरला

याआधी खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने दुकानदाराचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील मुख्य बाजारपेठेत लालचंद पसारी नावाचं दुकान आहे.

या दुकानात सोमवारी एक भामटा खरेदीच्या निमित्तानं आला. यानंतर दुकानातील कर्मचाऱ्याला काहीतरी दाखवण्यास सांगून त्याची पाठ वळताच या भामट्यानं दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन पळ काढला.

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.