विदीशा : त्या तरुणाचं शिक्षण केवळ आठवीपर्यंत झाले होते. परंतू लग्नाचं वय उलटत चाललं होतं. परंतू त्याचं शिक्षण नसल्याने लग्न ठरत नव्हतं. मग त्याने एक टेलर गाठत पोलीसांचे कपडे शिवले, हे कपडे त्याने शिवत आपण रेल्वेत आरपीएफमध्ये नोकरीला असल्याचे सांगत मुलगी पसंत केली. त्यानंतर मोठ्या थाटामाटात लग्न देखील केले. परंतू लग्नाच्या दोन दिवसानंतर काही तरी गडबड झाली आणि त्या तरुणाचं बिंग फुटल्याने वधूकडच्या मंडळींनी हंगामा केला. त्यानंतर जे झाले ते खळबळजनक….
विदिशाच्या कुरवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठा गावच्या रुपसिंह अहिरवार याचा विवाह भोपाळ येथील एका मुलीशी ठरला. आपण आरपीएफमध्ये पोलीस जवान म्हणून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस असल्याचे सर्व पुरावे त्याने तयार केले. पोलिसाचे ओळखपत्र, पे स्लीपची कॉपी तयार तेली. याला फसून वधूकडच्या मंडळींनी आंधळा विश्वास ठेवून ६ मे रोजी त्यांचे थाटामाटात लग्न झाले.
लग्नाच्या केवळ दोन दिवसानंतर या नकली पोलीसवाल्याची पोलखोल एका वधूच्या नातलगाने केली. त्यानंतर नववधून कुरवाई पोलीस ठाण्यात रितसर फसवणूकीची तक्रार केली. त्यानंतर एसपीनी टीम स्थापन केली. त्यानंतर आरोपी रुपसिंह याला त्याच्या कोटा गावातून अटक झाली. कोर्टाने त्याची रवानगी जेलमध्ये केली. या आरोपीने या नकली खाकी वर्दीचा वापर अनेक बेकायदेशीर कामे केल्याचाही संशय आहे.
नववधूच्या तक्रारीनंतर आरोपीला त्याच्या घरातून एक जोड नकली पोलीसाची वर्दी, कॅप, बुट आणि कागदपत्रांसह अटक केली. त्याच्या अन्य गुन्हयांबाबत चौकशी केली. एसडीओपी ललित कुमार डांगुर यांनी सांगितले की आरोपीने मंडी बामौरा येथील एका टेलरकडून पोलीसांची वर्दी शिवली होती.कॅप आणि बेल्टची ऑनलाईन खरेदी केली.आरोपी आठवी फेल असून तो बेकार होता. तर त्याची पत्नी 12 वी पास असून पदवी शिक्षण घेत आहे. महिलेने २ जुलै रोजी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करीत कोर्टात हजर करुन जेलमध्ये त्याची रवानगी केली आहे.