झारखंड : झारखंडची (Jharkhand) उपराजधानी दुमका (dumka) येथील एका घटनेमुळं पुन्हा चर्चेत आलं आहे. आपल्या पत्नीशी संबंध ठेवण्यासाठी एक तरुण धडपड करीत होता. हे लक्षात आल्यानंतर पतीने त्याला काठीने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे आपल्या पत्नीसोबत त्या तरुणाला अडचणीच्या परिस्थितीत पाहिला, त्यानंतर पतीने त्याला तिथं असलेल्या दांडक्याने जोराची मारहाण केली. त्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण रामगढ़ पोलिस स्टेशनच्या (ramgad police) अंतर्गत येत आहे. ठाकुर टुडू असं मृत झालेल्या तरुणाचं नावं आहे. त्याचबरोबर जोगिया गांवातील तो रहिवासी असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणाचे त्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. बुधवारी रात्री पोलिसांनी आरोपी ठाकुर टुडू याला रात्री उशिरा आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिलं, त्यानंतर चिडलेल्या पतीने त्या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. जोराची भांडण पाहून आजूबाजूची लोक जागाी झाली. तिथल्या काही ग्रामस्थांनी या घटनेची माहिती रामगढ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी आरोपी नारायण टुडू याला पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर त्याच्या पत्नीला सुध्दा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
तरुणाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवा आहे. त्याचबरोबर तरुणाला मारहाण करण्यात आलेलं दांडूक सु्द्धा पोलिसांनी तिथून ताब्यात घेतलं आहे. आरोपी नारायण तुडू यांनी सांगितले की, ते संपूर्ण कुटुंबासह दोन-तीन दिवसांपूर्वी गावी परत आला होता.