जयपूर : लग्न जमत नसल्याच्या रागातून तरूण मुलाने वयोवृद्ध वडिलांना लाथा-बुक्क्यांनी बेदम (son beat father) मारहाण केली. माझे लग्न लावून द्या, कुठूनही मुलगी शोधा, असे सांगत आरोपीने वडिलांना तुडवले. परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ वृद्धाच्या नातेवाइकांना माहिती दिली आणि रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील अर्थुना पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. येथील ओडवाडा गावात राहणारा 18 वर्षीय शंकर यादव याचे लग्न झालेले नाही. यामुळे हरीश वडिलांवर रागावला होता. रात्री उशिरा रागाच्या भरात हरीशने त्याचे वृद्ध वडील शंकर यादव यांना बेदम मारहाण केली. घटनेवेळी पिता-पुत्र घरात एकटेच होते. हरीशनेही वडिलांना सांगितले की, काहीही करा पण एक मुलगी शोधा आणि माझे लग्न लावून द्या. असे म्हणत त्याने वृद्ध वडिलांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
गल्लीतील लोकांनी कुटुंबियांना दिली खबर
परिसरातील लोकांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी जखमी वृद्धाच्या नातेवाईकांना माहिती दिली. वृद्धाचे नातेवाईक बाहेर गेले होते, ते रात्री घरी पोहोचले. रात्री उशिरा वृद्धाची पत्नी रतन व बहीण कमला यांनी शंकर यादव यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. घटनेच्या वेळी जखमी वृद्धाची पत्नी रतन या त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. वृद्ध दांपत्याला दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा अहमदाबादमध्ये काम करतो. आणि धाकटा मुलगा हरीश घरीच असतो.
मारहाणीत तुटले वृद्धाचे नाक
या मारहाणीनंतर वृद्धाच्या नाकाचे हाड तुटल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारादरम्यान डॉक्टरांनी 6 टाके घातले. याशिवाय गंभीर जखमा झाल्या आहेत. या वृद्धावर जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
जखमी वृद्धाची बहीण कमला हिने सांगितले की, माझा मोठा भाऊ, मुलासाठी या वयात मुलगी कोठून शोधेल ? त्याचा मुलगा दारू पिऊन भांडतो आणि लवकर लग्न लाऊन द्या असं सांगतो. पण एका दारू पिणाऱ्या मुलाला कोण आपली मुलगी देईल ? त्याने स्वत:च्याच वडिलांना मारहाण केली आहे.