आर्यन खान प्रकरणातील पंच के पी गोसावी पोलिसांना शरण जाणार; खुद्द गोसावीचा दावा

| Updated on: Oct 27, 2021 | 4:54 PM

के पी गोसावी याने लखनऊ येथे पोलिसांना शरण जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही केस तिथली नसल्याने लखनऊ पोलिसांनी त्यांच्या केसमधला तो वाँटेड आरोपी नसल्यामुळे तो इथे तो शरण जाऊ शकत नाही. त्यामुळे जिथे हा गुन्हा आहे तिथे त्याला शरण जाण्यास सांगितलं होतं.

आर्यन खान प्रकरणातील पंच के पी गोसावी पोलिसांना शरण जाणार; खुद्द गोसावीचा दावा
आर्यन खान प्रकरणातील पंच के पी गोसावी पोलिसांना शरण जाणार
Follow us on

मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावी आज पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचा दावा खुद्द के पी गोसावी याने केला आहे. टिव्ही 9 चे प्रतिनिधीशी बोलताना गोसावीने हा दावा केला आहे. किरण गोसावी महाराष्ट्रात पोहचला असून आज संध्याकाळी तो पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात शरण जाणार आहे. सध्या गोसावीचं लोकेशन पुण्याच्या आसपास असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Arbitrator in Aryan Khan case KP Gosavi to surrender to police; Gosavi himself claims)

के पी गोसावी याने लखनऊ येथे पोलिसांना शरण जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही केस तिथली नसल्याने लखनऊ पोलिसांनी त्यांच्या केसमधला तो वाँटेड आरोपी नसल्यामुळे तो इथे तो शरण जाऊ शकत नाही. त्यामुळे जिथे हा गुन्हा आहे तिथे त्याला शरण जाण्यास सांगितलं होतं. आमच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बातचीतमध्ये आपण कोर्टात जाणार नसून पुण्यातील फरासखाना पोलिसांना शरण जाणार असल्याचे सांगितले.

के.पी. गोसावी आणि टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीचा फोनवरील संवाद

रिपोर्टर कृष्णा सोनारवाडकर – किरण जी

किरण गोसावी – हा बोला

रिपोर्टर कृष्णा सोनारवाडकर – टीव्हि 9 मधून बोलतोय दोन तीन दिवसापासून काँल करतोय बोलण झालं नाही. तुम्ही पुण्यात पोहोचला आहेत का ?

किरण गोसावी – नाही मी पोहोचेल एक दोन तासात

रिपोर्टर कृष्णा सोनारवाडकर – तुम्ही सरेंडर कुठे करणार आहात कोर्ट की पोलिस स्टेशन ?

किरण गोसावी – पोलिस स्टेशनला करणार आहे

रिपोर्टर कृष्णा सोनारवाडकर – कुठल्या पोलिस स्टेशनला करणार सरेंडर ?

किरण गोसावी – फरासखाना पोलिस स्टेशनला

कृष्णा सोनारवाडकर – लखनऊला सरेंडरला ट्राय केल ना

किरण गोसावी – दोन तीन ठिकाणी ट्राय केलं सरेंडर..पण नाही झालं..

किरण उर्फ के. पी. गोसावी नेमका कोण?

किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता.

पुण्यातील तरुणाची फसवणूक

गोसावीने पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली.

पालघरमधील दोन तरुणांचीही फसवणूक

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.

मलेशियात नोकरीचं आमिष

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती. (Arbitrator in Aryan Khan case KP Gosavi to surrender to police; Gosavi himself claims)

इतर बातम्या

25 कोटीच्या आरोपावर समीर वानखेडेंना बाजुला ठेवलं पाहिजे? फडणवीस म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे !

एनीसीबीचं दिल्लीतून आलेलं पथक कामाला लागलं, समीर वानखेडेंचा जबाब नोंदवण्यास सुरुवात, कथित 25 कोटी डीलचं खरं-खोटं बाहेर पडणार