शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya)यांनी संजय राऊतांविरोधात बदनामीची तक्रार केली होती. या प्रकरणी कोर्टाने सोमय्या यांना दणका दिला आहे. शिवडी कोर्टाने संजय राऊतांविरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले होते. मेधा सोमय्या यांनी या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. भादंवि कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली होती. राऊत यांच्या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचे मेधा यांनी तक्रारीत म्हंटले होते.
सोमय्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. किरीट सोमय्यांकडून राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
सोमय्यांनी दाखल केलेल्या खटल्यानंतर शिवडी कोर्टाकडून राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. पण राऊत हजर न राहिल्याने कोर्टा त्यांच्याविरोधात जामीनपत्र अटक वॉरंट जारी केले आहे. अटक झाल्याच पाच हजार रुपयांच्या जामीनावर राोऊतांची सुटका होईल.
मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. यातील 16 शौचालयं बांधायचं काम किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आलेलं. या प्रकरणी खोटी कागदपत्र देऊन मीरा भाईंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता. प्रताप सरनाईक यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला होता.