तब्बल 604 किलो सोने, किंमत 340 कोटी, सोने तस्करीचा हब बनले मुंबई एअरपोर्ट

| Updated on: Apr 08, 2023 | 2:43 PM

सोन्याचे भाव 60 हजार रूपये प्रति तोळा पोहचल्यानेही सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे.

तब्बल 604 किलो सोने, किंमत 340 कोटी, सोने तस्करीचा हब बनले मुंबई एअरपोर्ट
मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह एकाला अटक
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या सोने तस्करीचा सर्वात मोठा अड्डा बनले आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचा भाव गगनाला भिडल्याने सोने स्मगलिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याच्या तस्करीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. गेल्या अकरा महिन्यात मुंबई विमानतळावरून 604 किलो सोन्याची तस्करी झाली आहे. ज्याची किंमतच 340 कोटी रूपये इतकी आहे. कस्टम विभागानेच ही आकडेवारी जाहीर केली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोने तस्करीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई विमानतळावरून गेल्या अकरा महिन्यात 340 कोटी रूपायांचे 604 किलोग्रॅम सोने तस्करी करताना सापडले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने याबाबतीत दिल्ली विमानतळालाही मागे टाकले आहे. दिल्ली विमानतळावर याच काळात 374 किलोग्रॅम सोने तस्करी करताना सापडले आहे. तर चेन्नई एअरपोर्टवर 306  किलोग्रॅम सोने सापडले आहे. ही सर्व आकडेवारी कस्टम विभागाने जारी केली आहे. मुंबई एअरपोर्टवर गेल्या एप्रिल 2022 पासून फेब्रुवारी 2023 पर्यंत आकडेवारीत वाढ झाली आहे. गोल्ड स्मगलर्ससाठी मुंबई हे खूप मोठे ट्रान्झिस्ट हब बनले आहे, जेथे या महागड्या धातूचे खरेदीदार खूप जास्त आहेत.

कस्टम अधिकाऱ्याच्या मते येथे अनेक सिंडीकेट काम करीत असतात. ज्यात ज्वेलर्स समवेत अनेक लोक सामील असतात. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई देखील सोने तस्कराचे पसंदीचे मार्ग आहेत. हैदराबाद देखील स्मगलिंगचे आकडे किंचित वाढले आहेत. या वर्षी हैदराबाद येथे 124 किलोग्रॅम सोने पकडले गेले. गेल्यावर्षी इकडे 55 किलोग्रॅम सोने सापडले होते.

कोरोनापूर्वी काय परिस्थिती….

कोरोनाकाळापूर्वी साल 2019-2020 मध्ये दिल्ली एअरपोर्टवर सर्वात जास्त सोने जप्त झाले होते. तेव्हा दिल्ली एअरपोर्टवर 494 किलोग्रॅम सोने, मुंबई एअरपोर्टवर 403 किलोग्रॅम आणि चेन्नईमध्ये 392 किलोग्रॅम सोने जप्त झाले होते. साल 2020-21 मध्ये गोल्ड तस्करीत थोडे शिथिलता आली होती. तेव्हा चेन्नईत एअरपोर्टवर 150 किलोग्रॅम सोने जप्त झाले होते. तर कोझिकोड एअरपोर्टवर 146.9 किलोग्रॅम, दिल्ली एअरपोर्टवर 88.4 किलोग्रॅम आणि मुंबई एअरपोर्टवर 87 किलोग्रॅम सोने जप्त केले होते.

सोन्याच्या तस्करीत 33 टक्क्यांनी वाढ

डीआरआयने 23 जानेवारी रोजी 22 कोटी रूपये किमतीचे 37 किलोग्रॅम सोने जप्त केले होते. तपास अधिकाऱ्यांनी काळबादेवीच्या एका व्यापाऱ्याकडून 2.3 कोटी रूपयांचे रोख रक्कम जप्त केली होती. या अधिकाऱ्याने मशिनच्या आत सोने लपवून आणण्यास मदत केली होती. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एअर इंटेलिजन्स युनिटने 28 कोटी रुपयांच्या 53 किलो सोन्याची तस्करी प्रकरणी नीरज कुमार नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, कोरोनापूर्व काळा पेक्षा सोन्याच्या तस्करीत आता 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कस्टम ड्यूटीत झालेली वाढ हे त्याचे मुख्य कारण असल्याचे म्हटले जाते.