सूरत : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2013 मधील बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवले असून, उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. गांधीनगर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय मंगळवारी सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावणार आहे. सुनावणी बराच काळ या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुरतमधील दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी 2013 मध्ये आसाराम बापूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2002 ते 2005 दरम्यान आसारामने वेळोवेळी बलात्कार केल्याचा आरोप या मुलींनी केला होता. या प्रकरणी न्यायालयाने एकूण 68 जणांचे जबाब नोंदवले होते. या घटनेप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने यापैकी सहा आरोपींना निर्दोष मानले आणि आसारामला दोषी ठरवले.
आसाराम बापू अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. या प्रकरणात आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायांना आरोपी करण्यात आले होते. या सर्वांची काही काळापूर्वी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. आता त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहत असताना बलात्कार झाल्याचे मुलींनी सांगितले. अहमदाबाद येथील आश्रमात आपल्यावर अनेकदा बलात्कार झाल्याचा आरोप मोठ्या बहिणीने केला होता.
जोधपूर न्यायालयाने त्यांना एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा सुनावली होती. 2013 मध्ये त्याने जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.
या प्रकरणात आसारामवर सुरतच्या दोन मुलींनी बलात्काराचा आरोप केला होता. लहान बहिणीने आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावर बलात्काराचा आरोप केला. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने आरोप योग्य ठरवत आसाराम बापूला दोषी ठरवले.