Atiq Ahmed : अतिकच्या कानशिलात गोळी घालणारा लवलेश झाला जखमी, गोळी लागल्याने रूग्णालयात उपचार सुरू

| Updated on: Apr 16, 2023 | 7:21 PM

आम्हाला अतिक आणि अश्रफ टोळीचा नामोनिशान मिटवून आपल्याला प्रदेशात आपले नाव कमवायचे होते असे आरोपींनी म्हटले आहे.

Atiq Ahmed : अतिकच्या कानशिलात गोळी घालणारा लवलेश झाला जखमी, गोळी लागल्याने रूग्णालयात उपचार सुरू
lavlesh-tiwari
Image Credit source: socialmedia
Follow us on

प्रयागराज : उत्तर प्रदेशचा गॅंगस्टर ते राजकीय नेता असा प्रवास करणाऱ्या अतिक अहमद ( वय 60 ) आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या पोलिसांसमक्ष झालेल्या हत्येने उत्तर प्रदेशचे राजकारणासह एकंदरच समाजजीवन हादरून गेले आहे. या हत्यांना पॉईंट ब्लॅंक रेंजने विदेशी पिस्तुलातून तडीस नेणाऱ्या लवलेश तिवारी याच्या सहभागाने त्याच्या आई-वडीलांसह शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही कोडे पडले आहे. अशात आता या लवलेश तिवारी यालाही झटापटीत गोळी लागल्याचे उघडकीस आले असून त्याच्यावर प्रयागराज येथील स्वरूप राणी मेडीकल कॉलेज रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती नेमली आहे.

समाजवादी पार्टीचे माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद दोघांनी काल शनिवारी पत्रकार बनून आलेल्या तिघा तरूणांनी पोलिसांच्या घेऱ्यात घुसून गोळीबार करीत हत्या केली. या प्रकरणात लवलेश तिवारी ( बांदा ), मोहित ऊर्फ सनी ( हमीरपुर ) आणि अरूण मौर्य ( कासगंज-एटा ) या तिघांनी घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान गोळीबार करताना पोलिसांशी झालेल्या झटापटीत लवलेशला गोळी लागून जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा उल्लेख एफआयआर मध्ये केला आहे. आम्हाला अतिक आणि अश्रफ टोळीचा नामोनिशान मिटवून आपल्याला प्रदेशात आपले नाव कमवायचे होते असे आरोपींनी म्हटले आहे. आम्ही पोलिसांच्या घेऱ्याचा अंदाज लावू न शकल्याने घटनास्थळावरुन पळून जाऊ शकलो नाही असा त्यांनी दावा केला आहे.

अखेर शनिवारी संधी मिळाली

अतिक आणि अश्रफ यांना पोलीस अटक करणार आहेत ही बातमी जेव्हा कळाली तेव्हापासूनच आम्ही मिडीयाच्या लोकांमध्ये मिसळून संधी मिळते का याची वाट पहात होतो, परंतू संधी काही मिळाली नाही. अखेर काल शनिवारी आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही बेत तडीस नेला असे या आरोपींनी म्हटले आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये हे ही लिहीले आहे गोळीबारात लवलेशलाही गोळी लागली आहे. त्याच्यावर स्वरूप राणी मेडीकल कॉलेजात उपचार सुरू आहे.

त्याने कॉलेज सोडले

लवलेश आई-वडीलांना सोडून एकटाच भाड्याच्या रूममध्ये रहात होता. पण तो घरी फार कमी वेळा यायचा असे त्याचे शेजारी म्हणत आहेत. त्याच्या आई-वडीलांनी बातमी टीव्हीवर पाहिल्यापासून त्यांची तब्येत बिघडली असून ते मानसिक तणावाखाली गेले आहेत. लवलेश याने बीए करण्यासाठी कॉलेजात प्रवेश घेतला होता. परंतू पहिल्याच वर्षी त्याने कॉलेज सोडले आणि तो वाईट संगतीत गेला.