गोंदिया : शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याची पावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोंदियात घडली आहे. जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दांडेगाव गावात ही घटना घडली. खेमलाल महारू पटले असे पीडित 56 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गंगाझरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मयताच्या कुटुंबीयांनी केली आहे. आरोपींनी शेतातून जात असताना पटले यांच्या डोक्यात लोखंडी पावड्याने वार करून जखमी केले.
शेतकऱ्याने गावातील एका व्यक्तीकडून अर्धा एकर जमीन विकत घेतली होती. त्यात स्पष्ट लिहिले होते की, शेतकऱ्याला येण्याजाण्यासाठी आरोपींच्या जमिनीतून 10 फुटांचा रस्ता देण्यात आला होता. मात्र आरोपींना न्यायालाचा आदेश मान्य नव्हता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच मतभेद होते. याच कारणातून शेतकरी आणि आरोपी यांच्यात भांडण व्हायचे. त्यामुळे शेतकऱ्याने न्यायालयात याबाबत तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने शेतकऱ्याला शेतातून ये-जा करण्यासाठी रस्ता द्या, असे आदेश दिले होते.
मात्र न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करत आरोपींनी शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले. शेतकऱ्यावर उपचारा सुरु आहेत. न्यायालयाचा आदेश न झुगारणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीय आणि नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी गंगाझरी पोलीस पुढील तपास करत आहेत.