बंगळुरूतील सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देश हादरला. मात्र मरण्यापूर्वी त्याने एक मोठं पत्र लिूहून हे पाऊल उचलण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्याने त्याची पत्नी, सासू आणि सासरचे नातेवाईक यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्याच्या नोटमध्ये मुलाचाही उल्लेख होता. याप्रकरणी अतुलची पत्नी, आईसह नातेवाईकांना अटक करण्यात आली. मात्र त्याच्या मुलाबद्दल काहीच अपडेट्स नव्हते. अखेर त्याचा मुलगा व्योम कुठे आहे याबद्दल आता माहिती समोर आली असून त्यामुळेच मृत अतुलच्या आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पोलिसांनी त्याचा पत्ता शोधून काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 वर्षांचा छोटा व्योम सध्या त्याची आई निकिता सिंघानियाच्या नातेवाईकाकडे राहत आहे. निकिताने आधीच त्याला तिथे पाठवले होते. व्योम सुरक्षित असून शाळेतही जात आहे.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणातील आरोपी व्योमची आई निकिता सिंघानिया, आजी निशा आणि मामा अनुराग हे सध्या बंगळुरू तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्या तिघांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आरोपींची न्यायालयीन कोठडी 30 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर त्या तिघांनाही पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या कालावधीत चौकशीत आरोपी जे पोलिसांना सांगतील, ते कोर्टासमोर सादर करण्यात येईल. त्यानंतर आरोपींवर पुढील कारवाई केली जाईल.
पैसे उकळण्यासाठी मुलाचा वापर
10 दिवसांपूर्वी,9 डिसेंबर रोजी अतुल सुभाष याने बंगळुरूतील घरात आत्महत्या केली होती. त्याची पत्नी, सासू, मेव्हणा आणि चुलत सासरा यांनी आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अतुलने लावला होता. त्याने 24 पानी सुसाईड नोटमध्ये इतरही अनेक गोष्टी लिहीत आरोप केले होते. आपल्याला आपल्या छोट्या मुलाला भेटूही दिलं जात नसल्याचं नमूद करत त्याची खूप आठवण येत असल्याचे त्याने सांगितलं. माझा मुलगा कसा दिसतो आता तेही आठवत नाही, त्याचा फोटो पाहिल्यावरच चेहरा आठवतो असं सांगत अतुलने त्याचं दु:ख या नोटमध्ये कथन केलं. हे लोक मुलाचा वापर करत असल्याचा, त्याच्याकडून पैसे फकळत असल्याचा आरोप केला होता. आपल्या मृत्यूनंतर मुलाचा ताबा, आपल्या आई-वडिलांकडे द्यावा अशी मागणीही अतुलने केली होती. यानंतर अतुलचा भाऊ विकास याने चार आरोपींविरुद्ध बेंगळुरू पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. 13 डिसेंबर रोजी पोलिसांनी निकिता हिला गुरग्राममधून तर तिची आई निशा आणि भाऊ अनुराग या दोघांना प्रयागराजमधून अटक केली.
राष्ट्रपती-पंतप्रधानांकडे अपील
आपण मुलगा तर गमावलाया आता नातू तरी मिळू दे अशी अतुलच्या वयोवृद्ध पित्याची इच्छा आहे. अतुलचे वडील पवन मोदी यांनी आपल्या नातवाच्या संरक्षणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. अटकेनंतर निकिताने आपल्या नातवासोबत काही बरे वाईट करू नये अशी त्यांनाा भीती होती. मात्र आता अखेर अतुलच्या मुलाचा शोध लागला असून तो सुरक्षित असल्याचंही समोर आलं आहे.
मुलगा कुठे,खुद्द निकीतानेच सांगितलं
निकिताने स्वत: बंगळुरू पोलिसांना मुलाबद्दल माहिती दिल्याचं उघड झालं आहे. तिचा लहान मुलगा व्योम हा फरीदाबादमधील बोर्डिंग स्कूलमध्ये शिकतो. एक नातेवाईक त्याची देखभाल करतात, अशी माहिती तिने दिल्याचे
जौनपूरचे पोलीस निरीक्षक रजनीश कुमार म्हणाले