मूळचा बिहारचा असलेला पण सध्या बंगळुरूत असलेला AI सॉफ्टवेअर इंजिनीअर अतुल सुभाष याच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिया पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. मुलाला गमावल्यानंतर त्यांना आता नातावाची चिंता सतावत आहे. त्यांची सून निकीता हिला लवकरात लवकर अटक व्हावी असे अपील त्यांनी केलं. माझ्या मुलाला तर मारू टाकलं, पण आमचा नातू तरी आता परत द्या, अशी विनवणीच त्यांनी केली. माझा मुलगा आणि सून यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. घटस्फोटासाठी तिने 20 लाख रुपयांची मागणी केली होती.
2021मध्येच तो ( अतुल) ही रक्कम देण्यास तयार होता, पण तेव्हा बोलणी फिस्कटली. तेव्हाच जर घटस्फोट झाला असता तर आज माझा मुलगा जिवंत असता. दुसरीकडे, कर्नाटक पोलिसांनी असा दावा केला आहे की, अटक टाळण्यासाठी निकिता ही गुरुग्रामच्या सेक्टर-57 येथील हाँगकाँग मार्केटमध्ये लपून बसली होती. सध्या कर्नाटक पोलिसांनी निकिता, त्याची आई, भाऊ आणि काका यांना अटक केल्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर केले. तेथून त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पोलिस बंगळुरूला रवाना झालेत. .
जौनपूर ते बनारस पोलिसांचा तपास सुरू
कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींच्या अटकेनंतर या घटनेचे थर सुटायला सुरुवात झाली आहे. कर्नाटक पोलिसांचे एक पथक अजूनही जौनपूर ते बनारसपर्यंत फिरत आहे. निकिताच्या बँक खात्यापासून लग्नाच्या ठिकाणापर्यंत पोलिसांचं हे पथक तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बरेच पुरावे मिळाले आहेत. एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी 80 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.
गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह
AI सॉफ्टवेअर इंजिनीअर अतुल सुभाष याचा मृतदेह बेंगळुरू येथील मंजुनाथ लेआउट येथील त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ‘जस्टिस इज ड्यू’ ( न्याय अजून बाकी आहे) असं लिहीलेला फलकही वळच होता. आपल्या मृत्यूसाठी त्याने त्याची पत्नी, सासू, भावजय आणि चुलत-सासरे यांना जबाबदार धरले होते. अतुलच्या वडिलांचाही हाच दावा आहे. निकिता त्याच्याच पैशाने खटला लढवून अतुलला त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले. तिला अतुलकडून पैसेही घ्यायचे होते आणि केसही तशीच चालू ठेवायची होती, असा दावा त्यांनी केला.
आमचा नातू अजूनही निकीताच्या ताब्यात आहे. माझा मुलगा तर गेला पण आता नातवाच्या सुरक्षेची चिंता आहे, तो तरी आम्हाला द्या, अशी मागणी अतुलच्या वडिलांनी केली आहे. अतुलच्या सुसाईड व्हिडीोमध्ये जे आरोप लावण्यात आले, त्याची कसून तपासणी करण्यात येणाप आहे. या व्हिडीओमध्ये अतुलने त्याची पत्नी , तिचे कुटुंबिय यांच्याशिवाय फॅमिली कोर्टातील जजवरही गंभीर आरोप लावले होते.