भाच्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, मामाला संपवण्यासाठी दिली मामीनेच सुपारी!

| Updated on: Aug 27, 2022 | 5:03 PM

Jharkhand : मामी गौशिया परवीन आणि भाचा मोहम्मद इरशाद यांच्या तब्बल 1 हजार 40 वेळा व्हॉट्सअप कॉल झाले होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत, याबाबत तौहीदलाही माहीत होतं. तौहीदने अनेकदा यालाविरोधही केला होता.

भाच्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, मामाला संपवण्यासाठी दिली मामीनेच सुपारी!
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: Social Media
Follow us on

भाच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून (Love Affire) मामीनेच मामाचा काटा काढण्यासाठी कट रचला होता. हे खळबळजनक कांड झारखंडमध्ये (Jharkhand crime News) घडलंय. याप्रकरणाचा खुलासा करताना पोलीस तपासातून अनेक गोष्टींचा उलगडा झालाय. सुपारी देऊन मामीनेच मामाच्या हत्याकांडाचा कट रचला होता. हत्येसाठीचा कट (Murder Plan) उलगडल्यानंतर झारखंडमधील पलामू परिसरही आता हादरुन गेला आहे. मामा आणि मामी यांना दोन मुलं देखील होती. 12 आणि 14 वर्षांची मुलं असणाऱ्या आईनेच आपल्या पतीची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. भाचासोबत असलेल्या प्रेमसंबंधांसाठी तिने हे कृत्य केल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. पोलिसांनी याप्रकरणी चार लोकांना अटक केली आहे. यात मामी, भाचा यांच्यासह इतर चार लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोळी घालून मामाचा खून करण्याचा या सगळ्यांचा प्लान होता. या गोळीबारप्रकरणातली ती गोळी आणि चार मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केलेत.

गोळी घालून हत्या करण्याचा होता प्लान

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, झारखंडमध्ये मोहम्मद तौहीद आलम यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारामागचा कट उलगडताना पोलिसांनी केलेला खुलासा शॉकिंगच होता. 17 ऑगस्ट रोजी मोहम्मद तौहीदला गोळी घालण्यात आली. रात्रीच्या वेळी गोळीबाराची ही घटना घडली. या गोळीबारामागे तौहीदला संपवण्यामागे त्याची पत्नी गौशिया परवी आणि त्याचा भाचा मोहम्मद इरशाद यांचाच हात असल्याचं तपासात समोर आलं. विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या तपासातून या दोघांचे कॉल डिटेल्सही पोलिसांनी तपासून काढले. त्यात आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली.

तब्बल 1040 वेळा व्हॉट्सअप कॉल

मामी गौशिया परवीन आणि भाचा मोहम्मद इरशाद यांच्यात तब्बल 1 हजार 40 वेळा व्हॉट्सअप कॉल झाले होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत, याबाबत तौहीदलाही माहीत होतं. तौहीदने अनेकदा यालाविरोधही केला होता. आपल्या प्रेमात बाधा होत असणारा काटा काढून टाकावा, या उद्देशाने गौशिया आणि इरशाद यांनी तौहीदचं हत्येचा कट रचला. त्यांनी आरजू, जुमन, मंजर, बिलाल या चौघांनाही या कटात सामील केलं. तौहीदच्या हत्येसाठी साडे तीन लाख रुपयांची सुपारीही दिली होती.

हे सुद्धा वाचा

बुलेट खरेदी करण्यासाठी इरशादने जे कर्ज घेतलं होतं, तेच पैसे त्याने सुपारी देण्यासाठी देऊन टाकले. पण आठ महिने उलटले तरी ठरल्याप्रमाणे हत्या करण्यात आली नव्हती. अखेर इरशाद पुन्हा पैसे परत मागू लागला होता. म्हणून चौघांनी गोळीबार करण्याचा प्लान केला. आणि 17 ऑगस्टला प्लान केल्याप्रमाणे तौहिद यांच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात तौहीत यांच्या पाठीला गोळी लागली आणि ते जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून हा कट रचलणाऱ्यांना अटक करण्यात आलीय. त्यांची कसून चौकशी केली जातेय.