औरंगाबाद : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोन भोंदू बाबांना अटक करण्यात आली आहे. गुंगीचे भस्म देऊन या भोंदू बाबांनी लोकांच्या घरात घुसून लूट केली होती. औरंगाबाद जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन आरोपी भोंदू बाबांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
गुंगीचे भस्म देऊन लुटणाऱ्या दोन भोंदू बाबांना औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात घुसून ते लोकांना गुंगीचे औषध देत असत त्यानंतर त्यांच्या घरात ते लूट करत होते. औरंगाबादमधील मुकुंडवाडी पोलिसांनी चोरी केली गेलेली मालमत्ता हस्तगत करुन 2 भोंदू बाबांना अटक केली आहे.
काळजी घेण्याचं आवाहन
पोलिसांनी लुटेत वापरला जाणारा भस्मही या दोन भोंदू बाबांकडून जप्त केला आहे. भोंदू बाबा आणि अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देणं टाळण्याच्या सूचना पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना दिल्या असून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
सोलापुरात मौजमजेसाठी चोऱ्या करणारे अटकेत
दरम्यान, टोळीचा म्होरक्या जेलमध्ये गेल्यानंतर दुकाने फोडणाऱ्या टोळीतील दोघा सदस्यांना सोलापुरात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. चोरांच्या टोळीचा म्होरक्या पुण्यातीस येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
नागपूरमध्ये एटीएममधून हायटेक चोरी
दुसरीकडे, एटीएममधून पैसे काढायचे मात्र त्याची नोंद कोणत्याही खात्यावर न होता सरळ बँकतून पैसे मात्र जात होते. हायटेक पद्धतीचा वापर करुन नागपुरातील वेगवेगळ्या भागातील एटीएममधून पैसे चोरणाऱ्या सायबर गॅंगला नुकतंच नागपूर पोलिसांनी जयपूरमधून अटक केली आहे. अनिस अब्दुल गफ्फुर आणि मोहमद तारीफ उमर हरियाणा अशी आरोपींची नावं आहेत. त्यांनी देशभरात अशाप्रकारे लूट केली असून त्यांची मोठी गॅंग असण्याचा संशय पोलिसांना आहे.
संबंधित बातम्या :
एटीएममधून हायटेक चोरी, सायबर गॅंगला नागपूर पोलिसांकडून जयपूरमध्ये अटक
म्होरक्या येरवडा तुरुंगात, टोळीच्या सदस्यांची मौजमजेसाठी चोरी, दोघे अटकेत
(Aurangabad Bhondu Baba arrested in loot case)