Baba Siddiqui : कुणालाच माहीत नसलेली गोष्ट उघड होणार? बाबा सिद्दीकींसोबत सावलीसारखा राहणाऱ्या व्यक्तीची होणार कसून चौकशी

| Updated on: Oct 18, 2024 | 9:24 AM

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येमुळे महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशातच खळबळ माजली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या 3 शूटर्सनी शिनवारी बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. याप्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहे. आत्तापर्यत 4 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन मुख्य आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे.

Baba Siddiqui : कुणालाच माहीत नसलेली गोष्ट उघड होणार? बाबा सिद्दीकींसोबत सावलीसारखा राहणाऱ्या व्यक्तीची होणार कसून चौकशी
बाबा सिद्दीकींसोबत सावलीसारखा राहणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी
Follow us on

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला आता 6 दिवस झाले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये सिद्दीकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य एक तरूणही जखमी झाला. त्याच्या पायात गोळी लागली. सिद्दीकी यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून सिद्दीकी यांची सलमानशी जवळीक असल्यानेच त्यांना टार्गेट करून संपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या हत्येनंतर पोलिसांनी आत्तापर्यंत चौघांना अटक केली असून त्यांच्या चौकशीतून नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत.

याचदरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर 4-5दिवसांनी त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी पोलीस ठाण्यात जाणून चौकशीला सहकार्य केल, जबाबही नोंदवला. या हत्याप्रकरणाचा पोलीस चहूबाजूंनी तपास करत असून याप्रकरणी सिद्दीकी यांच्यासोबत सतत राहणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.

बाबा सिद्दीकींच्या सुरक्षारक्ष पोलीस कॉन्स्टेबलचा नोंदवला जबाब

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवला आहे. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक म्हणून जो कॉन्स्टेबल होता, त्याचा जबाब मुंबई गुन्हे शाखेने नोंदवला आहे.

सिद्दीकी यांचा मुलगा झिशान यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली तेव्हा काही प्रश्न उपस्थित केले होते. सिद्दीकी यांच्यावर जेव्हा गोळीबार झाला तेव्हा कॉन्स्टेबलने तेव्हा तो रोखण्याचा प्रयत्न का केला नाही ? हल्लेखोरांना त्याने का अडवले नाही ? असे प्रश्न झिशान यांच्यातर्फे उपस्थित करण्यात आले आहे.

त्याच अनुषंगाने आता पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तेव्हा हा कॉन्स्टेबल कुठे उभा होता? फायरिंग झाल्यावर त्याने काय केलं ? तो घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या सुरक्षारक्षक कॉन्स्टेबलचा जबाबा नोंदवून घेतला आहे. त्यातून आता काय महत्वाची माहिती समोर येते, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

 

झिशान सिद्दीकी याने सोडलं मौन

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर 5 दिवसांनी, काल संध्याकाळी झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली. झिशान यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली. “ लोकांचं संरक्षण करताना आणि निर्दोष गरीब लोकांची घरं वाचवताना माझ्या वडिलांनी जीव गमावला. आज माझे पूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण व्हायला नको. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. मला न्याय हवाय, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय”, असं ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केलं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे एसआरएचाच मुद्दा असण्याची अधिक शक्यता आहे, असा अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.