12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथे प्रख्यात राजकारणी बाबा सिद्दीकी यांची तिघांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. याप्रकरणात आत्तापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे मात्र गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार, तसेच शुभम लोणकर आणि झिशान सिद्दीकी हे तिघे अद्यापही पोलिसांच्या ताब्यात सापडलेले नाहीत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत असून याप्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सिद्दीकींच्या हत्येच्या मुख्य सूत्रधाराने या हत्याकांडातील एका शूटरला पळून जाण्यासाठी बनावट पासपोर्ट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती समोर आली आहे. तपासातून ही माहिती मिळाल्याचे पोलिसांनी गुरूवारी नमूद केले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकींवर गोळ्या चालवणारा शूटर गुरमेल सिंग ( वय 23) याला 50 हजार रुपये देण्यात आले होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार गौतम या तिघआंनी 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथे, आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकी यांची गोल्या झाडून हत्या केली. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन शिवकुमार गौतम हा पळून गेला पण गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीतून बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे.
आरोपी गुरमेल सिंग हा हरियाणातील कैथल येथील रहिवासी असून त्याच्यावर 2019 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रकरणात दोषी ठरवले जाण्याची भीती त्याला होती. आणि त्याचसाठी त्याला देश सोडून पळून जायचे होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. सिद्दीकींच्या हत्येचा कट आखणाऱ्यांनी गुरमेल याला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून भारत सोडून जाण्यास मदत करू असे आश्वासन गुरमेलला दिले होते.
शिवकुमार, धर्मराज आणि गुरनेल हे नेमबाजांच्या “दुसऱ्या मॉड्यूल” मधील होते. या हत्येचे प्रमुख मास्टरमाइंड मोहम्मद झिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांच्या संपर्कात होते.त्यांना या हत्येसाठी दोन लाख देण्यात आले होते. त्यापूर्वी शुभम लोणकर यांने मुंबईतील राम कनौजिया आणि नितीन सप्रे या गँगला सिद्दीकींच्या हत्येची सुपारी दिली होती, मात्र त्यांनी एक कोटींची मागणी केली जी रक्कम लोणकरला खूप मोठी वाटली. अखेर त्याने उत्तर प्रदेशातील शिवकुमार आणि इतर दोघांना हत्येची सुपारी दिली, असेही पोलीस तपासातून आत्तापर्यंत समोर आलं आहे.