Baba Siddiqui : सिदीक्कींच्या हत्येसाठी उत्तर प्रदेशचे मारेकरीच का निवडले ? पोलीस चौकशीतून मोठा खुलासा

| Updated on: Oct 19, 2024 | 2:18 PM

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचे धागेदोर दूरपर्यंत पसरले असून या हत्याकांडात गुंतलेल्या सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रात्रंदिवस एक करून तपास करत आहेत. याप्रकरणी आधी चार आरोपींना अटक केल्यानंतर शुक्रवारी आणखी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Baba Siddiqui : सिदीक्कींच्या हत्येसाठी उत्तर प्रदेशचे मारेकरीच का निवडले ? पोलीस चौकशीतून मोठा खुलासा
बाबा सिद्दीकी
Follow us on

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या शनिवारी रात्री भररस्त्यात हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या तीन शूटर्सनी स्मोक बॉम्बचा वापर करत धूर केला आणि त्याचाच फायदा घेत सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हत्याकांडाला आठवडा उलटला असून मारेकरी व हत्याकांडात सामील असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहेत. पोलिसांनी आत्तापर्यत दोन मारेकरी, एक हँडलर व त्यांना मदत करणारा इसम अशा चौघांना अटक केली होती. तर शुक्रवारी आणखी 5 जणांनाही बेड्या ठोकल्या. मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी अंबरनाथ, डोंबिवली आणि पनवेल परिसरातून आणखी 5 आरोपींना अटक केली. त्याच्या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पोलिसांनी शुक्रवारी नितीन सप्रे (वय 32)याला डोंबिवलीमधून तर संभाजी पारधी (वय 43) याला पनवेल येथून अटक केली. तर राम कनोजिया (वय 44), प्रदीप ठोंबरे (वय 37) आणि चेतन पारधी (वय 27) या तिघांना अंबरनाथ येथून अटक करण्यात आली.

हत्येसाठी मागितली होते 1 कोटी

हे सुद्धा वाचा

अटक करण्यात आलेला आरोपी राम कनौजिया याने पोलिसांच्या चौकशीदरम्यान महत्वाचे खुलासे केले. बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा खुलासा कनौजिया याने पोलिसांना सांगितलं. बिश्नोई गँगचा माणूस असलेल्या शुभम लोणकरने सुरूवातीला राम कनौजिया याला तसेच नितीन सप्रे याला सिद्दीकींच्या हत्येचे कंत्राट दिलं होतं. मात्र राम कनौजिया हे मूळच महाराष्ट्रातीलच रहिवासी असून सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काय प्रतिक्रिया उमटतील याची त्याला कल्पना होती. हे कंत्राट घ्यायची राम कनौजिया याची इच्छा नव्हती, म्हणूनच त्याने हत्येसाठी 1 कोटी या मोठ्या रकमेची मागणी केली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

राम कनौजियाची मागणी ऐकल्यानंतर शुभम लोणकर याला ही रक्कम खूपच मोठी वाटली, त्याने तसे बोलूनही दाखवलं,त्यानंतरच लोणकर याने त्याला कंत्राट देण्याचा विचार बदलला.

उत्तर प्रदेशच्या मारेकऱ्यांना का दिली हत्येची सुपारी ?

बाबा सिद्दीकी यांची महाराष्ट्रातील प्रतिमा आणि त्यांच्या राजकीय उंचीबद्दल, महत्वाबद्दल उत्तर प्रदेशातील लोकांना फारशी माहिती नसेल, त्यामुळे ते कमी पैशांतही खून करायला तयार होतील असा अंदाज शुभम लोणकरला होता. त्यामुळे राम कनोजिया आणि नितीन सप्रे यांनी हत्या करण्यास नकार देत पाठ फिहा परवली तेव्हा शुभमने हे काम उत्तर प्रदेश मॉड्यूलला दिले. त्यानंतर धर्मराज कश्यप, गुरनैल सिंग आणि शिवकुमार गौतम यांना हत्येची सुपारी देण्यात आली. अखेर पुण्यात कट रचून, रेकी करून शनिवारी या तिघांनी सिद्दीकी यांची हत्या केली आणि ते पळून गेले. मात्र पोलिसांनी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग या दोघांना अटक केली तर शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर हे अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. शुभम लोणकर हा परदेशात पळून जाण्याची भीत असल्याने त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.