Baba Siddiqui murder : बाबा सिद्दीकी हत्येतील मुख्य सूत्रधार शुभम लोणकर विरोधात लूकआऊट नोटीस

| Updated on: Oct 17, 2024 | 8:38 AM

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली असून पोलीसांनी कसून तपास करत आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहेय. या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत दोन मारेकरी , एक हँडलर आणि त्यांना मदत करणारा आणखी एक इसम अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. धर्मराज […]

Baba Siddiqui murder : बाबा सिद्दीकी हत्येतील मुख्य सूत्रधार शुभम लोणकर विरोधात लूकआऊट नोटीस
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी शुभम लोणकरविरोधात लूकआऊट नोटीस जारी
Follow us on

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली असून पोलीसांनी कसून तपास करत आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहेय. या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत दोन मारेकरी , एक हँडलर आणि त्यांना मदत करणारा आणखी एक इसम अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग, हरीशकुमार आणि प्रवीण लोणकर अशी त्यांची नावे आहेत. प्रवीण लोणकर हाँ या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार शुभम लोणकरचा भाऊ आहे. शनिवारी सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. शुब्बू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक अकाउंटवरुन संबंधित पोस्ट व्हायरल करण्यात आली होती.तोच हा शुभम लोणकर. दरम्यान या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार असणारा आणि फेसबूक पोस्टवरून हत्येची जबाबदारी घेणार शुभम लोणकर याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. शुभम हा परदेशात पळून जाण्याची भीती असून त्याच पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेने त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. शुभम लोणकर हा नेपाळला पळून जाण्याची शक्यता आहे. त्याला रोखण्यासाठीच ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचणे तसेच आरोपींना आर्थिक मदत करणे आणि गुन्ह्यासाठी हत्यारं पुरवणे यात शुभमचा सहभाग होता असा संशय पोलिसांना आहे. सध्या शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर गुन्हे शाखेच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

शुब्बू लोणकर नेमका कोण ?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची सध्या केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु करण्यात आली. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता अकोला पोलिसांनी देखील तपास सुरु केला आहे.

याआधीही झालेली कारवाई

अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी दाखल झाले. मात्र शुभम लोणकर याच्या घराला कुलूप लावलेले होते. त्याच्या घरी कोणीही नसल्याचे पोलिसांना आढळून आलं आहे. विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी त्याच्याकडून तब्बल तीन पिस्तुल आणि 11 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते.

त्या प्रथेनं प्रथेनं शिवकुमारचा आत्मविश्वास वाढला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य हल्लेखोराबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला शिव कुमार लग्न सोहळ्यांमध्ये बंदूक वापरायला शिकला होता, अशी माहिती गुरनेल सिंह आणि धर्मराज कश्यप यांनी पोलीस चौकशीत दिली. ‘उत्तर भारतातील राज्यांमध्ये लग्न सोहळ्यांमध्ये आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला जातो. अशा सोहळ्यांमध्ये शिव कुमार हटकून जायचा. तिथेच तो बंदूक हाताळण्यास, गोळीबार करण्यास शिकला,’ अशी माहिती आरोपींनी चौकशी दरम्यान पोलिसांना दिली.

सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात शिव कुमार गौतमच मुख्य हल्लेखोर होता. आमची निवड केवळ शिव कुमारला बॅकअप म्हणून करण्यात आलेली होती. गेल्या महिन्याभरापासून मुंबईत राहत असताना यूट्यूब पाहून आम्ही हत्यार लोड, अनलोड कसं करायचं ते शिकलो होतो. अशी माहिती गुरनेल सिंह आणि धर्मराज कश्यप यांनी दिल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे