पाव सप्लाय करण्यावरून क्षुल्लक वाद, चौघांचा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला

| Updated on: Oct 18, 2022 | 2:12 PM

शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी भूषण हळदणकर याच्यासह एकूण 4 जणांना बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाव सप्लाय करण्यावरून क्षुल्लक वाद, चौघांचा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला
अंबरनाथमध्ये पाव सप्लाय करण्यावरून क्षुल्लक वाद
Image Credit source: TV9
Follow us on

निनाद करमरकर, TV9 मराठी, अंबरनाथ : व्यावसायिक वादातून (Business Dispute) एका बेकरी चालकासह त्याच्या कामगारांवर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा (Attempt to Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. भूषण हळदणकर असे मुख्य आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शहा आणि उपनिरीक्षक शेख हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

चिखलोली येथे आहे सामीद खान याची बेकरी

अंबरनाथच्या चिखलोली गाव भागात सामीद खान याची कामरान बेकरी आहे. या बेकरीतून तो अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाव सप्लाय करतो. मात्र बदलापूर शहरात इतर बेकरीतून पाव घेऊन सप्लाय करणाऱ्या भूषण हळदणकर याला सामीद याच्याबद्दल व्यावसायिक राग होता.

व्यावसायिक रागातून बेकरी चालकावर जीवघेणा हल्ला

याच व्यावसायिक रागातून त्याने 14 ऑक्टोबर रोजी तीन वेळा फोनवरून सामीद याला शिवीगाळ केली. तसंच दोन वेळा प्रत्यक्ष भेटून त्याला शिवीगाळ आणि दमदाटी केली. मात्र शिवीगळ करुन त्याचा राग शांत झाला नाही.

हे सुद्धा वाचा

यानंतर रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तो काही गुंडांना घेऊन थेट सामीद याच्या बेकरीवर पोहोचला. शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला चढवला. सामीद याच्यासह त्याचे भाऊ आणि कामगारांवर भूषणने हल्ला चढवला.

हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी

सामीद खान, त्याचा भाऊ कामिल खान, खालिद खान, कामगार मोहम्मद युसूफ शहा, उदय नारायण चौधरी यांच्यावर भूषण आणि त्याच्यासह आलेल्या गुंडांनी तलवारी, चॉपर आणि इतर हत्यारांनी हल्ला चढवला. यात हे सगळेच गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी भूषण हळदणकर याच्यासह एकूण 4 जणांना बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.