बंगळुरू | 23 ऑक्टोबर 2023 : देशभरात सध्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड (crime news) वाढले आहे. लूटमार, चोरी, पाकिटमारी, दरोडा, गुन्ह्यांच्या अशा अनेक घटना हल्ली कानावर पडत असतात. अशीच एक चोरीची घटना बंगळुरूमध्ये (banglore crime) घडली. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही चोरी भररस्त्यात, भरदिवसा झाली तरी कोणाचेच त्याकडे लक्ष गेले नाही आणि चोर लाखोंचा माल घेऊन फरार झाले. रस्त्यावर पार्क केलेल्या एका बीएमडब्ल्यू कारमधून (theft in car) चोरट्यांच्या दुकलीने १३ लाख रुपये पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
20 ऑक्टोबर रोजी घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून अवघ्या एका मिनिटात चोरट्यांनी ही चोरी केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण लवकरच उघड होईल आणि आरोपींना अटक करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काय आहे त्या व्हिडीओमध्ये ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक बीएमडब्ल्यूकार रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसते. तेवढ्यात बाईकवरून दोन तरुण तिथे आले. एक तरुण बाईकवरून खाली उतरला आणि बीएमडब्ल्यू गाडीभोवती फेरी मारून त्याने टेहेळणी केली. तर त्याचा दुसरा साथीदार आजूबाजूला बघत लक्ष ठेवत होता. यानंतर पहिल्या तरूणाने त्या कारची ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने असलेली काच एक फोडली आणि तो उडी मारून आत झेपावला.
रस्त्यावरील लोकांना कळलंच नाही
त्याने त्या कारमधून एक बॅग बाहेर काढला. तोपर्यंत त्याचा मित्र आजूबाजूल लक्ष ठेवत उभा होता. त्यानतंर पहिल्या तरूणाने आतून आणखी एक पिशवी काढली. दोन्ही पिशव्या हातात पकडून तो पटकन बाईकवर बसला आणि दोघेही तिथून लगेच फरार झाले. हा संपूर्ण प्रकार समोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हा प्रकार दिवसाढवळ्या घडला. त्यावेळी काही लोकं थोड्या अंतरावरच उभे होते, पण त्यांना याबद्दल जराही सुगावा लागला नाही. चोरट्यांनी कार्यभाग साधला आणि ते सरळ पळून गेले.
#WATCH | Rs 13 lakhs stolen from a parked car in Bengaluru on 20th October; case registered, say police.
(Video source: Bengaluru Police) pic.twitter.com/u8V4K5tGzI
— ANI (@ANI) October 23, 2023
खास उपकरणाने तोडली काच
ज्या कारमधून ही चोरी झाली ती BMW X5 असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कारची काच फोडण्यासाठी चोरट्याने एका खास साधनाचा वापर केला आहे. काच फोडल्यानंतर तो खिडकीतून कारमध्ये शिरला. यावेळी दुचाकीवर बसलेला त्याचा दुसरा साथीदार इकडे-तिकडे लोकांवर लक्ष ठेवून होता. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे.