13 हजार न्यूड फोटो, बॉयफ्रेंडचा मोबाईल हाती घेताच ती हादरली..

| Updated on: Nov 30, 2023 | 12:19 PM

एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडच्या फोनमध्ये 13 हजार नको ते फोटो सापडले. त्या फोनमध्ये केवळ तिचेच नव्हे तर कंपनीतील इतर महिलांचेही फोटो होते.

13 हजार न्यूड फोटो, बॉयफ्रेंडचा मोबाईल हाती घेताच ती हादरली..
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

बंगळुरू | 30 नोव्हेंबर 2023 : तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे मनुष्याचे आयुष्य सुखकर झाले आहे हे नक्की. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतानात, तसेच तंत्रज्ञानाबाबतही आहे, त्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. त्यामुळे अडचणीही वाढू शकतात. त्याचेच एक ताजं, धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. मेट्रो सिटी आणि टेक्नालॉजी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तेथे एका तरूणीला तिच्या बॉयफ्रेंडचा मोबाईल चेक करताच मोठा धक्का बसला. कारण त्याच्या फोन गॅलरीमध्ये तिच्यासह अनेक महिलांचे, नको त्या अवस्थेतील फोटो सापडले. मोबाईल फोन गॅलरीमध्ये तरूणीला, तिचे, तसेच तिच्या काही महिला सहकारी आणि इतर काही महिलांचे मिळून एकूण 13,000 हजार न्यूड फोटो सापडले. एवढे फोटो पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

हादरलं बीपीओ

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरूणी 22 वर्षांची असून एका बीपीओमध्ये काम करते. तिच्याच ऑफीसमध्ये काम करणारा आदित्य संतोष या तरूणासोबत ती गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होती. त्याचदरम्यान आदित्यने त्या तरूणीचे नको त्या अवस्थेमधील फोटो काढले होते. याचाच संशय आल्याने तिने फोन चेक करायला घेतला आणि ती हादरलीच.

हे प्रकरण उघडकीस येताच तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच तिच्या ऑफीसमधील वरिष्ठ सहकाऱ्यांनाही या संपूर्ण घटनेची कल्पना दिली.

फोन ॲक्सेस केल्यावर जे दिसलं

हे संपूर्ण प्रकरण बेलंदूर येथील बीपीओ कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीच्या लीगल हेडने 23 नोव्हेंबर रोजी सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी आदित्य याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला कंपनी ऑफीसमधून अटक करण्यात आली.

संशय आला म्हणून केला मोबाईल चेक

आदित्यने काही इंटिमेट फोटो काढले असावेत, असा संशय त्या तरूणीला आला. त्याच्या मोबाईल गॅलरीमधील फोटो डिलीट करण्याचा तिचा प्लान होता. त्यासाठीच तिने त्याच्या न कळत मोबाईल घेतला आणि चेक केला. पण त्यातील डेटा पाहून ती हादरलीच.

कारण त्या मोबाईलमध्ये त्या तरूणीसोबतत, इतर काही महिलांचे असे मिळून तब्बल 13 हजार न्यूड फोटो तिला दिसले. ही धक्कादायक माहिती तिला समजल्यानंतर मात्र काही क्षणात तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडून टाकले. तसेच या घटनेची माहिती बीपीओ सेंटरच्या एचआरला आधी सांगितली. कारण त्यामध्ये कार्यालयातील इतर महिलांच्या फोटोचांही समावेश होता. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिने हा प्रसंग लगेच वरिष्ठांना कळवला. कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याकडे हे प्रकरण गेल्यानंतर मात्र त्यांनी या प्रकरणी पोलिसात त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिस घेत आहेत फोन रेकॉर्डचा शोध

आदित्यच्या फोटोमध्ये सापडलेल्या 13 हजार फोटोंबद्दल तपास सुरू आहे. तसेच हे फोटो ओरिजनल आहेत की मॉर्फ केलेले आहेत या सर्व गोष्टींचा शोध सुरू आहे. त्याने ते फोटो का काढले, त्या फोटोंचा वापर करून तो कोणाला ब्लॅकमेल करत होता का, हेही तपासले जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी त्याचे चॅट्स आणि फोन कॉल्स यासह कम्युनिकेशन हिस्ट्रीही तपासण्यात येणार आहे.