Video | हॉटेलमध्ये बसू न दिल्याचा मनात राग, मित्रांना बोलवून सिनेस्टाईल राडा, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 04, 2021 | 9:14 PM

आमच्याच गावात हॉटेल टाकून आम्हालाच बसू न दिल्याचा राग धरत मल्हार राज नावाच्या हॉटेलची तोडफोड तसेच जोरदार राडा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी या गावात शनिवारी (3 जुलै) रात्री ही घटना घडली.

Video | हॉटेलमध्ये बसू न दिल्याचा मनात राग, मित्रांना बोलवून सिनेस्टाईल राडा, व्हिडीओ व्हायरल
VBARAMATI FIGHT VIRAL VIDEO
Follow us on

पुणे : आमच्याच गावात हॉटेल सुरु करून आम्हालाच बसू दिले नाही म्हणून मल्हार राज नावाच्या हॉटेलची तोडफोड तसेच जोरदार राडा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी या गावात शनिवारी (3 जुलै) रात्री ही घटना घडली. हॉटेल बंद करुन मालक घरी गेल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या साथिदारांना जमवत या हॉटेलची तोडफोड करत जोरदार राडा घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी या प्रकरणी एकूण 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Baramati hotel manager beaten by group of people because not allowed to seat them inside hotel)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील कऱ्हाटी या गावात मल्हार राज नावाचे एक हॉटेल सुरु करण्यात आले. सध्या कोरोना प्रतिबंधक नियम लागू असल्यामुळे हॉटेलमधून फक्त पार्सल मिळेल असे येथील वेटरने सांगितले. पण आमच्याच गावात हॉटेल सुरु करुन आम्हालाच बसू देत नसल्याचे म्हणत मनात राग धरून एका माणसाने हॉटेलच्या वेटरसोबत वाद घातला. त्यानंतर प्रकरण वाढत असल्यामुळे हॉटेलच्या मालकाने मध्यस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

हॉटेलवर सिनेस्टाईल राडा 

नंतर या प्रकरणावर पडदा पडल्यानंतर हॉटेलचा मालक घरी गेला. मात्र, वाद घालणाऱ्या माणसाचा राग शांत न झाल्यामुळे त्याने आपल्या मित्रांना जमवले. तसेच मित्रांच्या मदतीने हॉटेलवर सिनेस्टाईल राडा घातला.

हॉटेलमधील मॅनेजरला जबर मारहाण

यावेळी माणसाने जमवलेल्या टोळक्यांनी हॉटेलमधील मॅनेजरला जबर मारहाण केली. तसेच हॉटेलमधील संगणक, शीतपेयाच्या बाटल्या फोडल्या. या बाटल्या हॉटेलमधील मॅनेजरच्या डोक्यामध्येही मारण्यात आल्या.

पाहा व्हिडीओ :

11 जणांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी एकूण 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या :

मुंबईत हायप्रोफाईल वस्तीत Ambergris ची खरेदी-विक्री, पोलिसांकडून सापळा रचत टोळीचा पर्दाफाश

ऑनलाईन शस्त्रास्त्र तस्करी, 49 तलवारींसह धारदार शस्त्रं जप्त, औरंगाबादेत आरोपी ताब्यात

कर्जाचा डोंगर, वाढत्या अपेक्षा… मला माफ करा; MPSC उत्तीर्ण स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट जशीच्या तशी…

(Baramati hotel manager beaten by group of people because not allowed to seat them inside hotel)