गोंदिया – गोंदिया (Gondia) जिल्हातील अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon) येथील संविधान चौक टॅक्टरमधील बाटऱ्या चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. साधारण नऊ हजार रूपयांच्या बॅटरी चोरीला गेल्या होत्या. पोलिसांनी (Gondia Police) अधिक चौकशी केली असता, पोलिसांना दोन नावे समजली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता. त्यांच्याकडे चोरीला गेलेल्या बॅटऱ्या मिळाल्या आहेत. लखनसिंग टाक व बलदेवसिंग टाक अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दोन आरोपींना न्यायालयात हजर केले होते. परंतु सोमवार पर्यंत त्यांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करीत आहे.
उभ्या असलेल्या 2 ट्रॅक्टर मधील दोन बॅटरी किंमत 9 हजार रूपये किमतीच्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.या प्रकरणात IPC 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.अर्जुनी मोर पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून या प्रकरणात 2 आरोपी लखनसिंग टाक व बलदेवसिंग टाक अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 9 हजार रुपयांच्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या हस्तगत करण्यात करण्यात आल्या आहे.
परिसरात अनेकदा बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्या बॅटरी कोणी चोरी केल्या हे उद्याप स्पष्ट झालेलं नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी आत्तापर्यंत असे किती गुन्हे केले आहेत याची चौकशी करण्यात येणार आहे.