नाशिक : शहरात मुलं पळवणारी टोळी (Child abductors) आली म्हणत ब्लँकेट विकणाऱ्यांना दोघांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या टाकळीरोड परिसरात ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी उपनगर पोलीसांना (NashikPolice) कळवताच पोलीसांचे पथक दाखल झाले होते. पोलीसांनी त्यांची चौकशी करत कागदपत्रे (Documents) तपासली. मुलं पळवणारी किंवा चोरणारी ही टोळी नसल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघा ब्लँकेट विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा (Crime) दाखल न करता सोडून दिले.
यापूर्वी देखील अशा गैरसमजूतीतून मारहाणीच्या घटना समोर आल्या आहे. मुलं पळवणारी किंवा चोरणारी टोळी आली म्हणत नागरिक बेदम मारहाण करतात.
पालघरमध्येही मागे मुलं पळवणारी टोळी आली म्हणून साधू-महंतांची हत्या झाली होती. त्यावरून राजकीय रान देखील पेटले होते.
आताही सांगली येथे मुले चोरणारी टोळी समजून साधूंना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे.
मुलं चोरी करणारी टोळी म्हणून यापूर्वी धुळे-जळगाव या परिसरात देखील नागरिकांनी मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
नाशिकच्या घटनेत दोघेही ब्लँकेट विक्रेते असल्याचे तपासांती लक्षात आले. परिसरातील नागरिकांनी मारहाण करणाऱ्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला आहे.
टाकळी परिसरात ब्लँकेट विकत असताना परिसरातील कर मोगल साळवे यांचा लहान मुलगा याने ब्लँकेट ओढल्याने ब्लँकेट विकणार्याला त्याचा राग आला होता.
त्याने लहान मुलाचा गळा धरला ही बाब परिसरातील नागरिकांनी बघितली अशी माहिती नागरिक सांगताय. त्यांवेळी मुलं पळवणारी टोळी तर नाही म्हणून मारहाणीचा प्रकार समोर आला.