Beed Accident: मुलाला हॉस्पिटलमध्ये नेत होती, वाटेत भीषण अपघात! महिला पोलिसासह मुलावरही काळाचा घाला

| Updated on: Aug 30, 2022 | 2:23 PM

या अपघातातील मृत पोलीस कर्मचारी महिलेचं नाव कोमल शिंदे आहेत. त्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायला निघाल्या होत्या. त्या दरम्यानच काळाने या दोघांवरही घाला घातला. दरम्यान, दुसऱ्या कारमध्ये असलेल्या डॉक्टर इलियास यांनाही अपघातात जखम झाली.

Beed Accident: मुलाला हॉस्पिटलमध्ये नेत होती, वाटेत भीषण अपघात! महिला पोलिसासह मुलावरही काळाचा घाला
बीडमध्ये अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बीड : राज्यातील अपघाताचं (Road accident) सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. एका भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचारीचा जीव गेलाय. तर 9 वर्षांचा चिमुरडाही अपघाताचा बळी ठरलाय. दोन भरधाव कार एकमेकांसमोर धडकल्या आणि हा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की गाड्या मुख्य रस्ता सोडून शेतात एकमेकांवर आदळल्या. बीडच्या परळी (Beed Accident, Parali) येथे झालेल्या या अपघातातने एकच खळबळ उडाली. यातील महिला कर्मचारी ही आपल्या मुलाला रुग्णालयात घेऊन जात होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला. या दोन्ही कार रस्त्याच्या एका खड्ड्यामध्ये एकमेकांवर पडलेल्या स्थितीत आढळून आल्यात. या अपघातातील मृत पोलीस कर्मचारी महिला (Komal Shinde) ही बीड जिल्ह्यातील दिंद्रूड इथं कामाला होती.

या अपघातातील मृत पोलीस कर्मचारी महिलेचं नाव कोमल शिंदे आहेत. त्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायला निघाल्या होत्या. त्या दरम्यानच काळाने या दोघांवरही घाला घातला. दरम्यान, दुसऱ्या कारमध्ये असलेल्या डॉक्टर इलियास यांनाही अपघातात जखम झाली. त्यांच्यासह इतर दोघे जण कारच्या भीषण अपघातामध्ये जखमी झाले. या जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

मृतांची नावे :

  • कोमल शिंदे, महिला पोलीस कर्मचारी
  • 9 वर्षांचं बाळ (नाव कळू शकलेलं नाही)

जखमींची नावे :

  • नवनाथ लटपटे, पोलीस कर्मचारी
  • इलियास, डॉक्टर

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्ते अपघातांचं भीषण वास्तव वारंवार अधोरेखित होताना पाहायला मिळालं. मात्र तरिही रस्ते अपघातातील बळींचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतोच आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. शिंदे कुटुंबीयांवर या अपघाताने मोठा आघात झालाय. दरम्यान तिकडे जळगावतील चोपडामध्ये पिक व्हॅन पलटी होऊन भीषण अपघात सोमवारी रात्री झाला. या अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झालेत.