बीड: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीची पार पडली आहे. ग्रामपंचायत निकालातील वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत. निवडणूक निकालातील काही चांगल्या गोष्टी समोर आल्यानंतर आता वाईट गोष्टी देखील समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील एका गावात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याचा आनंद साजरा करताना कार्यकर्ते भान विसरल्याचं पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घराबाहेर कपबशा फोडल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.कपबशा फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Beed Gram Panchayat election wining candidate supporters celebrate victory by cup breaking at front of defeated candidate)
वंचितच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी कपबशा फोडल्याची घटना अलीकडच्या राजकारणाचं स्वरुप कसं बदलतंय हे दाखवून देणारी आहे. ग्रामपंचायत निवडणुकादरम्यान होणारे तंटे आणि वाद राज्याला नवीन नाहीयत. बीडमध्ये मात्र ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं.
बीड जिल्ह्यातील मोची पिंपळगाव येथील ग्रामपंचायत निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी आनंदोत्सव आणि विजयाचा जल्लोष साजरा करताना मर्यादाओलांडल्याचं पाहायला मिळालं. विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी वंचितच्या उमेदवाराचं निवडणूनक चिन्ह असलेले कपबशीचे बॉक्स बाजारातून विकत आणले. त्यानंतर कार्यकर्ते दुचाकीवरून वंचितच्या उमेदवाराच्या घरासमोर पोहोचले. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर समर्थकांनी अक्षरशः कपबशा फोडत आनंद व्यक्त करण्यात आला. या प्रकारामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचितच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पिंपळनेर पोलिसात तक्रार दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनंतर हा प्रकार घडला. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांकडून कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. कपबशा फोडण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.
संबंधित बातम्या:
VIDEO | कुटुंबाच्या विरोधानंतरही ग्रामपंचायतीत बाजी, पठ्ठ्याचा शर्ट काढून दंड थोपटत जल्लोष
स्वीडन ते दिग्रसवाणी, डॉ. चित्रा कुऱ्हेंची ग्रामपंचायतची विजयी कहाणी
यशस्वी स्त्रीच्या मागे, खंबीर पुरुषाचाही हात असतो, महाराष्ट्रात व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी!
(Beed Gram Panchayat election wining candidate supporters celebrate victory by cup breaking at front of defeated candidate)