परळी (बीड) : परळीत सध्या चोरांचा सुळसुळाट वाढल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील काही भागात रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. तसंच रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात चोरांची एकच दहशत निर्माण झाली आहे. (Beed Parali Vehicle Vandalized by a mob at midnight)
परळी शहरातील तुळजाई नगर, कृष्णा नगर, गणेशपार आदी भागात घरासमोर लावलेल्या गाड्यांची भुरट्या चोरांनी तोडफोड केली आहे. गाड्यांच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे रस्त्याने जात असताना आडव्या आलेल्या नागरिकांनाही मारहाण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.
अज्ञात गुंडांनी मोटार सायकलवरून येत रॉड, दगड-विटांनी काचा फोडून दहशत निर्माण केली. स्थानिकांमध्ये या प्रकाराने भीती निर्माण झाली असून त्यांनी पोलिस प्रशासनाने यासंदर्भात कडक पावलं उचलावीत, अशी विनंती केली आहे.
दुसरीकडे रोज रात्री पोलिसांनी पेट्रोलिंग जरी केली असती तर असे प्रकार घडले नसते असंही स्थानिकांनी म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
(Beed Parali Vehicle Vandalized by a mob at midnight)
हे ही वाचा :
तरुणाचा यूट्युब पाहून बॉम्ब बनवण्याचा प्रयोग फसला, डिफ्युज करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव