बीड : बीडमधून (Beed) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड आगारामध्ये उभ्या असलेल्या एका एसटी बसमध्ये (St Bus in Beed ST Depot) एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळला आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह (Dead body found in ST Bus) आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे. उभ्या एसटीमध्ये वयोवृद्ध व्यक्तीचा नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास गघेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय. या घटनेची माहिती मिळताच, शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आता याबाबत अधिक तपास करत आहेत. दरम्यान एसटी आढळलेला मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नेमका हा सगळा काय प्रकार आहे, याबाबत पोलीत अधिक तपास करत आहेत. बीड एसटी आगारात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ही धक्कादायक घटना घडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी एसटी बस भोवती गर्दी केली होती.
तीन महिन्यांपासून एसटी संप सुरु आहे. त्यामुळे अनेक एसटी बस या आगारात आहेत. अशातच बीड एसटी आगारात दुपारच्या सुमारास एका एसटी बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. एमएच 14 बीटी 2237 या नंबरच्या एसटीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली होती.
एसटीतील लोखंडी दांड्याला दोर बांधून त्या दोरीवर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सध्या एसटीचा संप सुरु आहेत. त्यामुळे नेमका हा प्रकार कुणी केला आहे, यावरुनही शंका घेतली जात होती.
दरम्यान, हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगितलं जातंय. ज्या व्यक्तीचा मृतदेह एसटी बसमध्ये आढळून आला, त्या व्यक्तीचं नाव निवृत्ती आबुज असल्याचं कळतंय. हा व्यक्ती नेमका कोण आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्यक्त शाहूनगर भागातील असल्याचं बोललं जातंय. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या व्यक्तीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस तपासानंतर समोर येईल.
Washim Accident : वाशिममध्ये कार व दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार
भाडे न भरणे हा गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाचा भाडेकरुंना मोठा दिलासा
पेपर फुटी प्रकरणात खाजगी शिक्षकांचं मोठं जाळं असण्याची शक्यता : सूत्र