संसर्गजन्य आजारमुळे दोन मुलांचा मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप

| Updated on: Aug 20, 2023 | 3:15 PM

BEED NEWS : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, एकाचं घरातील दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे गावकरी चांगलेच घाबरले आहेत.

संसर्गजन्य आजारमुळे दोन मुलांचा मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप
BEED
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड : बीड (BEED NEWS) जिल्ह्यात मागच्या एक धक्कादायरक घटना घडली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग (health department) खडबडून जागं झालं आहे. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (maharashtra) विविध साथीचे आजारांनी डोकेवरती काढल्याची चर्चा आहे. सध्या सगळीकडं डोळ्यांची (eye flue) साथ सुरु आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात ही साथ असल्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. पण एकाचं गावातील दोन मुलांचा डेंग्यूमुळं मृत्यू झाल्यामुळे गावकरी चांगलेचं घाबरले आहेत.

अबांसाखर परिसरात आजाराचे थैमान

अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा, वाघाळवाडी, अबांसाखर परिसरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. पंधरवड्यात सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडं खळबळ माजली आहे. डेंग्यू आजाराचे बरेचशे रूग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, याकडे मात्र प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थी जोगेश्वरी विद्यालयात शिक्षण घेत होते

गजाकोष आदर्श सतिश (वय 9) इयत्ता 4 थी या मुलाचा 1 ऑगस्टला मृत्यू झाला, तर गजाकोष पूनम सतिश (वय 7) इयत्ता 2 री या मुलीचा पंधरा दिवसांनी मृत्यू झाला आहे. हे दोघेही वाघाळा परिसरात राहणारे असून दोन्ही विद्यार्थी जोगेश्वरी विद्यालयात शिक्षण घेत होते अशी माहिती समजली आहे.

वाघाळा, वाघाळवाडी, अबांसाखर परिसरातील बरेच ग्रामस्थ डेंग्यू आजाराने त्रस्त आहेत. बहुतांश रूग्ण येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय, बर्दापुर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत अबांसाखर परिसरात फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.