नवी दिल्ली : बिहार (bihar news) राज्यातील एका प्रशासकीय अधिकाऱ्यावरती एका तरुणीने आरोप केले आहेत. ती तरुणी सध्या भारतीय रेल्वेत नोकरी (Indian Railway) करीत आहे. त्या तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली आहे. त्याचबरोबर पाच वर्षे खोटं बोलून शारिरीक संबंध ठेवल्याचा सुध्दा आरोप केला आहे. त्या तरुणीने या संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाला माहिती दिली आहे. ज्यावेळी अधिकारी (BDO) छोट्या पदावरती होता. त्यावेळी त्याने महिलेसोबत अनेक वर्षे शारिरीक संबंध ठेवले आहेत. ज्यावेळी तो अधिकारी झाला, त्यावेळी त्याने विविध कारण देऊन त्या महिलेला टाळू लागला. त्याचबरोबर तिचा नंबर सुध्दा ब्लॉक केला आहे.
त्या तरुणीने आपल्याला न्याय मिळावा यासाठी महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्या तरुणीने तक्रारी म्हटलं आहे की, 2017 साली त्या तरुणीची त्या अधिकाऱ्याशी ओळख झाली. दोस्तीचं रुपांतर प्रेमात कधी झालं,
दोघांना सरकारी नोकरी असल्यामुळे मुलगी अधिक खूश होती. गेल्यावर्षी त्या तरुणाची सप्लाई इन्स्पेक्टर पदावरुन बीडीओ म्हणून नियुक्ती झाली. ज्यावेळी त्या तरुणाला पद मिळालं, त्यावेळी त्याने लग्नाला नकार दिला. ज्यावेळी तरुण बीडीओ नव्हता. त्यावेळी त्याने तरुणीसोबत अनेकदा शारिरीक संबंध ठेवले आहेत.
ज्यावेळी ती तरुणी लग्नाचा विषय काढायची, त्यावेळी तो तरुण आईचा कारण सांगून तिला टाळत होता. त्यानंतर त्याने त्या तरुणीशी बोलणं कमी केलं. तरुणीचे फोन सुध्दा घेणं, त्या तरुणीने बंद केले. एक दिवस त्याने आपलं पद एका लेव्हलचं नसल्याचं सांगून लग्नाला नकार दिला.
पण तरुणीने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. त्यावेळी तरुणीचे घरचे त्या तरुणाच्या घरी गेले. परंतु तरुणीच्या आईने अधिक हुंडा मागितला.
त्यानंतर ती तरुणी महिला आयोगाकडे गेली. तरुण अनेक अधिकाऱ्यांकडे मदत मागितली आहे. त्याचबरोबर बिहारच्या मुख्यमंत्र्यांना सुध्दा तसं निवेदन दिलं आहे. आरोपी बीडीओने त्या तरुणीला तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली आहे.