नवी दिल्ली : श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताब जेलमध्ये आहे. आफताब वालकरने श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. नवी दिल्लीत एक मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरनगरची एका महिलेचा मृतदेह एका फ्रीजमध्ये सापडला. नजफगड गावाबाहेरील भागात धाब्यावर ही फ्रीज होती. आरोपी साहीलला पोलिसांनी अटक केली.
मुलीची हत्या कश्मिरी गेटजवळ आयएसबीटीजवळ गळा दाबून करण्यात आली. मुलीचा मृतदेह मित्राच्या गावी नेऊन धाब्यावर ठेवण्यात आला. आरोपीचे नाव साहील गहलोत आहे. तो २६ वर्षांचा आहे. साहीलला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.
कारमध्ये खून केल्यानंतर मृतदेह मित्राच्या धाब्यावरील फ्रीजमध्ये ठेवण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, साहील आणि मुलगी गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होते. साहीलचे लग्न दुसरीकडे होणार होते. मुलीने याचा विरोध केला. त्यामुळं साहीलने तिला संपवलं. कारमध्ये गळा तिचा खून केला.
दिल्ली पोलिसांना आज सकाळी माहिती मिळाली. त्यानुसार युवतीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी साहीलला त्याच्या गावावरून अटक केली.
विचारपूस केल्यानंतर भयावह घटना पुढं आली. त्याने तिला आधी कारमध्ये संपवलं. त्यानंतर तिचा मृतदेह फ्रीडमध्ये ठेवला. याची माहिती पोलिसांना झाली. पोलीस घटनास्थळी गेले. फ्रीडमधून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर साहीलचा शोध घेतला. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. विवाहास अडचण ठरत असल्याने साहीलने तिला संपवल्याची माहिती समोर येत आहे.