किक बॉक्सिंग (Kick Boxing) चॅम्पिअनशिप दरम्यान 23 वर्षांच्या एका तरुणाचा जीव गेला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल (Video Viral) झाला आहे. निखिल सुरेश या मृत किक बॉक्सरचं नाव आहे. लाईव्ह सामन्यात एका पंचने निखिल जागच्या जागी कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. तिथे निखिलची नाजूक प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. पण कोणत्याच उपचाराना निखिल प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. निखिलच्या मृत्यूबद्दल कळल्यानंतर सगळ्यांच मोठा धक्का बसला. यानंतर आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलंय. निखिलच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी किक बॉक्सिंग चॅम्पिअनशिपचं (23 year old boy died in Kick Boxing) आयोजन करणाऱ्या आयोजकांवर आरोप केले आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे निखिलचा जीव गेला, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत आता पुढील तपास सुरु केलाय.
#Karnataka #Bengaluru
Police have registered a negligence case against organisers after boxer Nithin died after he received a blow from opponent in state level kickboxing championship. @IndianExpress pic.twitter.com/PgiwkPK4Tp हे सुद्धा वाचा— Kiran Parashar (@KiranParashar21) July 14, 2022
किक बॉक्सिंगदरम्यानचा निखिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मुलाला गमावल्यानं या निखिलच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किक बॉक्सिंगदरम्यान, निखिल हा सामन्यात निळ्या रंगाच्या कपड्यात दिसतोय. प्रतिस्पर्धी बॉक्सरच्या एका पंचने तो जागच्या जागी कोसळल्याचं दिसतं. यानंतर रिंगमधील पंच त्याच्याजवळ धावून जातात. पण निखिल तोपर्यंत बेशुद्ध झालेला असतो. सुरुवातील उपस्थितांना या घटनेचं गांभीर्य लक्षात येत नाही. प्रत्येक जण सामन्याच्या उत्साहात असतो. पण थोड्याच वेळात या उत्साहावर विरजण पडतं.
बंगळुरुच्या म्हैसर इथं निखिल सुरेशनं दोन दिवसांच्या किक बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भाग घेतलेला होता. राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन कर्नाटक असोसिएशनने केलेलं होतं. रविवारी झालेल्या सामन्यादरम्यान निखिल रिंगणात उतरला होता. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. पश्चिम बंगळुरुतील एका कमरशिअल कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
निखिल हा म्हैसूरच्या केआर मोहल्ला इथं राहायला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो किकबॉक्सिग खेळत होता. रिंगमध्ये पंच लागल्यानंतर जागीच कोसळलेल्या निखिलला नगरभावी येथील जीएम हॉस्पिटलमध्ये सुरुवातील दाखल करण्यात आलं. पण त्यांनी प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहून त्याला नंतर मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं निखिलला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण तो उपचारांना काहीच प्रतिसाद देत नसल्यानं त्याला अखेर बुधवारी मृत घोषित करण्यात आलं.
निखिलचे वडील पी सुरेश यांनी मुलाच्या मृत्यूनंतर पोलीस तक्रार केली आहे. या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांवर त्यांनी हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी 304 अ नुसार गुन्हा दाखल करुन घेतला असून पुढील तपास केला जातो आहे. निखिलचा मेडिकल रिपोर्ट, आयोजकांची चौकशी आणि इतर तपास आता पोलिसांकडून केला जातोय. त्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.